belgaum

Ccb meetingहलगा येथे नियोजित सांडपाणी प्रकल्पा विरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाचे पडसाद मंगळवारी झालेल्या पालिका सर्वसधारण बैठकीत उमटले होते आमदार संजय पाटील यांनी लक्षवेधी सूचना करत सांडपाणी प्रकल्प राबवा मात्र हलगा येथील शेतकऱ्यांची सुपीक जमीन बदलून अन्यत्र राबवा अशी मागणी केली त्या नंतर महापौर संज्योत बांदेकर या विषयी अधिक तपशील गोळा करा आणि सादर करा आदेश अधिकाऱ्यांना देत या विषयी विशेष बैठक बोलावून निर्णय घेऊ मात्र या साठी पिकाऊ जमीन बळकावू नये अशी भूमिका महापौरानी घेतली.

सुरुवातील आमदार संजय पाटील यांनी हा प्रकल्प शेतकऱ्यांना कसा मारक आहे हे निदर्शनास आणून देऊन प्रकल्प राबवा मात्र हलगा येथे नको अन्यत्र अशी भूमिका घेत लक्षवेधी मांडली या नंतर नगरसेवक पंढरी यांनी शेतकऱ्यांची पिकाऊ जमीन संपादन रेवेन्यु खात्याने संपादित करण्याचा निर्णय घेतला होता ज्यावेळी सभागृह अस्तित्वात नव्हत त्यावेळीच हा निर्णय आहे त्यामुळे सुपीक जमीन संपादनास पालिका सभागृह जबाबदार नाही अस मत व्यक्त केल.

यास उत्तर देताना पालिका आयुक्त शाशिकदार कुरेर यांनी शहरातील जनतेच्या आरोग्याच्या दुष्टीकोनातून विहिरी आणि बोरवेल पाणी दुषित होत असल्याने प्रांत अधिकाऱ्यांनी २०१३ साली १९ एकर २० गुंठे जमीन संपादन केल असल्याच सांगत १ मे १९८६ साली पालिकेने अलारवाड येथील सर्वे नंबर ३०, ३१, ४१, ४८, ४० मधील १४० एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र कालांतराने हा निर्णय रद्द करण्यात आला आणि पुन्हा २०१३ मध्ये हा प्रकल्प हलगा येथे करण्याचा निर्णय झाला असल्यची माहिती सांगितली. यावेळी माजी महापौर किरण सायनाक यांनी या अगोदर १०७४ पासून हा प्रकल्प का प्रलंबित आहे आणि ५ ठिकाणी सर्वे केलेल्या जागांचा तपशील मागत अधिकार्यांना धारेवर धरले नगरसेवक रतन मासेकर रमेश सोनटक्की आमदार फिरोज सेठ,  देखील अधिकाऱ्यांना याची विस्तृत माहिती विचारली. त्यानंतर महपौर संज्योत बांदेकर यांनी  शेतकऱ्यावर अन्याय न करता हा प्रोजेक्ट पूर्ण करू या विषयी विशेष बैठक बोलावून सविस्तर चर्चा करण्याच आश्वासन दिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.