जय महाराष्ट्र म्हणण हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ते म्हणायला आम्हाला कोणीही बोलू शकणार नाही हिम्मत असेल तर माझ आमदारकीच पद रद्द करा अस थेट आवाहन आमदार संभाजी पाटील यांनी कर्नाटक सरकारला दिल आहे . मराठी परी पत्रक आणि इतर मागण्या साठी समितीच्या वतीने मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात आमदार संभाजी पाटील सामील झाले होते . केंद्र आणि राज्य सरकारने सीमा भागातील मराठी जनतेवरील अन्याय दूर करावेत अशी मागणी हि त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्य्मंत्र्यांची बैठक केंद्राने बोलवावी हा हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली .