सर्वच चित्रपटगृहांवर छापेतहसीलदार आणि प्रांताधिकार्यांनी काल आयनॉक्स वर छापा मारून फूडकोर्ट ला टाळे ठोकले होते, आज महानगरपालिकेने बिग सिनेमाज वर ही कारवाई केली आहे. याचबरोबरीने शहरातील सर्वच महत्वाच्या चित्रपटगृहांना भेटी देऊन पाहणी केली असून तेथील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत.
मनपा आयुक्त शशिधर कुरेर, आरोग्यधिकारी शशिधर नाडगौडा आणि पर्यावरण अधिकारी उदयकुमार यांनी अचानक भेट देऊन ही कारवाई केली आहे.
प्रकाश चित्रपटगृहात शितपेयांच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची जदा दराने विक्री केल्याचा प्रकार दिसला आहे, काही प्रेक्षकांनी या चित्रपटगृहात ए सी सुरू नसल्याची तक्रारही केली.
स्वरूप मध्येही पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ महागड्या दराने विकल्या जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.काही चित्रपटगृहांना फूडकोर्ट साठीचा परवाना दाखवता आला नाही,तर बिलबुक ही नव्हते. विविध सरकारी नियमांचे पालन होत नसल्याची गोष्ट दिसताच कारवाई करण्यात येणार आहे.
सर्व चित्रपटगृहांना मालमत्ता आणि करमणूक कर भरण्यास सोमवार ही शेवटची मुदत आहे, व्यापार परवाना ही सोमवार पर्यंतच घ्यावा लागणार आहे, फूड कोर्ट समोर दर पत्रक लावावे लागेल आणि एम आर पी पेक्षा जादा दराने काहीही विकता येणार नाही असे पालिका आयुक्त कुरेर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पालिकेने चांगले रस्ते आणि गटारी पुरविण्याकडे लक्ष द्यावे, चित्रपटगृहांवर लक्ष देण्यापेक्षा जनतेला सोयी पुरवण्याकडे लक्ष द्या अशा प्रतिक्रिया चित्रपटगृह चालकांनी मांडल्या.