मागील वर्षी 62.०२%निकाल मिळवत राज्यात 16 व्या नंबरवर असलेला बेळगाव जिल्हा यावर्षी च्या पी यु सी निकालात एकदम मागे पडला असुन 44.25% निकाल मिळवत राज्यात एकूण 30 कॉलेज पैकी 28 व्या नंबर वर फेकला गेला आहे.
राज्यातील 132 कॉलेजचा निकाल शून्य टक्के लागला मागील वर्षी ही संख्या 91 होती गुरुवारी पी यु सी चा निकाल पाहण्यासाठी अनेक सायबर कॅफे मध्ये गर्दी पाहायला मिळत होती. बेळगाव जिल्हा एज्युकेशनल हबब म्हणून ओळखला जात असला तरी राज्यात शेवटून दुसरा नंबर आल्याने शिक्षण संस्थाना याचा विचार करण्याची गरज बनली आहे. उडुपी,मंगळुरू, कारवार,शिमोगा आणि चिक्कमंगळूर हे टॉप 5 जिल्हे आहेत.