Saturday, July 13, 2024

/

मिस्टर इंडिया – सुनील आपटेकर आठवड्याच व्यक्तीमत्व

 belgaum

Sunil aptekarमिस्टर इंडिया हे नाव जरी चित्रपटाचं असलं तरी समस्त बेळगावकर जनतेला या नावाची खरी ओळख करून दिलेले व्यक्ती सुनील आपटेकर यांना बेळगाव live चा आठवड्याच व्यक्तिमत्व हा मान आम्ही देत आहोत. बॉडी बिल्डिंग मध्ये सुनील यांच योगदान अविस्मरणीय आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले 40 नंबर मराठी शाळेत प्राथमिक बेनन स्मिथ हायस्कुल मध्ये माध्यमिक तर जी एस एस मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलेले सुनील नारायण आपटेकर हे बेळगावच एक अनमोल रत्न आहे.

1990 च्या दशकात बॉडी बिल्डिंग हा महागडा खेळ होता बेळगाव सारख्या लहान शहरात यास वाव देखील नव्हता प्रायोजक नव्हते अत्याधुनिक व्यायामशाळा नव्हत्या आणि सर्वात महत्वाचं आज जितक्या प्रमाणात आहेत तितके रोख रक्कमेची बक्षीस देखील नव्हती अस असताना अत्यंत प्रतिकूल स्थितीत आपटेकर यांनी बॉडी बिल्डिंग मध्ये मिळवलेलं यश आजही युवकांना प्रेरणादायी ठरत आहे.
सुनील यांनी तीन वेळा म्हणजे 1995, 1996 आणि 2001 मध्ये मिस्टर इंडिया हा किताब तर 1997 मध्ये मिस्टर आशिया हा किताब पटकावला होता.कर्नाटकात मिस्टर इंडिया मेडल मिळवणारे पहिले खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं .त्यांच्या या यशाने राज्य शासनाने एकलव्य तर कै सुरेश हुंदरे यांनी बेळगाव भूषण , जैन समाजाने अरिहंत पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय.

आज वयाने जरी 54 वर्षीय असले तरी एक तरुणाला लाजवेल अशी पर्सनॅलिटी त्यांनी मेंटेन केली आहे सध्या ते भारतीय रेल्वेत चीफ तिकीट इन्स्पेक्टर चीफ कमर्शियल मॅनेजरच्या खास पथकात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.बेळगावात रणजित किल्लेकर सारखा मिस्टर इंडिया तर कोल्हापुरातून सुहास खामकर आणि संग्राम चौगुले यासारखे वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियन घडवत द्रोणाचार्य ची भूमिका त्यांनी चोख पणे बजावली आहे. स्पोर्ट्स सेमिनार घेणे,शालेय विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणे,व्यायाम व्यसन मुक्ती चा प्रचार प्रसार करणे बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसीएशन मध्ये कार्य करणें असे कार्य ते करतच आहेत.

सुनील सारखे खेळाडू दिल्ली हरियाणा किंवा बिहार मध्ये राहिले असते तर आज नक्कीच स्पोर्ट्स अधिकारी पदापर्यंत पोचले असते महाराष्ट्रात राहिले असते तर आर्थिक दृष्ट्या संपन्न झाले असते मात्र बेळगावात असल्याने अजूनही त्यांचं टॅलेंट आणि ते खितपत पडलेत .सुनील आपटेकर यांना त्यांच्या योगदानास आणि पुढील वाटचालीस बेळगाव live च्या शुभेच्छा!!!!??

1 COMMENT

  1. खूपखूप छान लिहलय सरजी…
    मस्तच खूप अभिमान अाहे सरजी अाम्हाला तूमचा…
    जय हिंद,जय महाराष्ट्र…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.