आपले कुटुंब शिकलं आपला संसार व्यवस्थित झाला तर जास्त कोणीही सामाजिक कामाकडे लक्ष देत नाहीत मात्र एक सामाजिक ऋण म्हणून आपला समाज सुधारावा यासाठी अनेक उपक्रमातून कार्य करत असलेल गोपाळराव बिर्जे हे बेळगाव live चे या आठवड्याचे व्यक्तिमत्व ठरले आहेत .
वडगाव येथील एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या गोपाळराव यांनी अनेक युवकांना रोजगार,गरीब विध्यार्थ्यांना शिक्षणात मार्गदर्शन, शिबीर,कोचिंग क्लासेस आणि सामुहिक विवाह सारखे कार्यकम राबवत बिरजे यांनी समाजा समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
गोपाळ बिर्जे हे एल आय सी मध्ये विकास अधिकारी म्हणून निवृत्त झालेत सेवेत असतेवेळी त्यांनी गोरगरीब अश्या ६० मुलांना एल आय सी मध्ये रोजगार देत अनेकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे.त्यांचा समाज सुधारण्याचा हा प्रवास शासकीय सेवेत असतानासुरु झाला असून त्यांनी मराठा जागृती निर्माण संघाच्या माध्यमातून आपली कार्ये सुरु ठेवली आहेत दरवर्षी आय आय टी प्राध्यापक डॉ गोपाळ पाटील ,मानस शास्त्र तज्ञ डॉ विनय कोपर्डे सारख्या दिग्गजांची विध्यार्थाना मार्गदर्शन शिबीर आयोजित करत असतात. संघाच्या सभागृह कार्यालयात दर रविवारी मराठी माध्यमाच्या विध्यार्थ्या साठी मोफत इंग्लिश शिकवण दिली जाते प्रा शिवाजी कदम आणि सहदेव रेडेकर गोपाळरावांच्या प्रेरेणेतून हे कार्य करत असतात.
पतीच्या निधनाच्या पश्च्यात आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलेल्या बेळगावातील २६ कष्टाळू मातांचा केलेला सत्कार देखील आदर्शवत ठरला आहे. मराठा जागृती निर्माण संघाच्या वतीने दहावी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना करियर गायोडन्स मार्गदर्शन शिबीर आयोजन केल जात. बेळगाव भागात यु पी एस सी पास होणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी ते निवृत्त आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना डिग्री उत्तीर्ण झालेल्यांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे. सामुहिक विवाह करण्याच श्रेय देखील त्यांनाच ध्याव लागेल सुराज्य निर्माण संघाच्या माजी अध्यक्ष असलेल्या गोपाळ बिर्जे यांनी २८ जोडप्यांचे विवाह करण्यास हातभार लावला आहे.शेतकऱ्यासाठी कुरी हाकलने स्पर्धा ,पंडित शंकर पाटील हे मोफत संगीत क्लास देखील मराठा जागृती निर्माण संघाच्या वतीनं घेत असतात
सध्याचा समाजाने आपली मानसिकता बदलण्याची गरज असून नको त्या गोष्टीकडे वाढलेला कल दूर करण्याची गरज त्यांनी बेळगाव live शी बोलताना मांडली आहे. आज काल युवक दिवाळी आली कि किल्ला बनवणे , शिव जयंतीत ढोल पथक, गणेश उत्सव ,दही हंडी, दुर्गामाता दौड ,पारायण दिंडी जत्रा अश्या माध्यमातून वर्षातील ३६५ पैकी २१५ दिवस यातच घालवत आहेत उत्सव जत्रा करा मात्र त्यासाठी एकेक महिना देण्यापेक्षा कमी वेळ घ्या वेळेचा सदुपयोग करून नोकरी उद्योग धंदे करियर आणि अभ्यासाकडे लक्ष दिल तर समाजात अधिक सुधारणा होईल अशी त्यांची भूमिका आहे . लक्ष्मी यात्रा अवाढव्य खर्च करून 8 दिवसाच्या न करता २ दिवसांच्या कराव्यात अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट मांडली आहे. मराठा समाज सुधारणा मंडळ,सुराज्य निर्माण संघ,मराठा जागृती निर्माण संघ, घुमटमाळ मारुती मंदिर अश्या संस्था मधून ते कार्यरत आहेत. समाजासाठी खारीचा वाटा म्हणून का होईना समाज सुधारण्यासाठी कार्य करणाऱ्या गोपाळ बिर्जे यांच्या कार्यास बेळगाव live कडून शुभेच्छा
गोपाळ बिर्जे
मोबईल ०९४४९६५०५५४