चपाती करणाऱ्या महिलेला जी बी सिंड्रोम ची लागण
मदतीचे आवाहन
वझे गल्ली वडगाव ची रहिवासी असलेल्या आणि जी बी सिंड्रोम ची बाधा झालेल्या महिलेचे आधार ठरले आहेत माजी महापौर विजय मोरे. आपल्या अथर्व मेडिकल फौंडेशन तर्फे तिला २५ हजार रुपयांची मदत ते देणार आहेत.
बेळगाव live ने केलेल्या आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे, शोभा शशिकांत हावळ वय ५० या चपात्या करून पोट भरणाऱ्या महिलेस जीबी सिन्ड्रोम या रोगाची लागण झाली आहे.
गरिबी आहे, पती नाही, त्यातच दोन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी आहे, आज त्याच दोन मुलींना तिला सांभाळण्याची वेळ आली आहे.
तिला येळ्ळूर रोड येथील केएल इ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून मदतीसाठी समाजाने पुढे यावे असे आवाहन बेळगाव live च्या माध्यमातून करण्यात आले आहे . तिला आणखी मदतीची गरज असून 7892257053 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन बेळगाव live करीत आहे.