शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा पावसात घरावरील पत्रे कोसळून चिमुरडा ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील गुंडेनट्टी गावात घडली आहे. जोतिबा रवी बेळगावी वय 5 वर्ष अस मृतक मुलाचं नाव आहे. त्याची आई मंजुळा बेळगावी या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
हणमंत कुलकर्णीं नावाच्या मालकीच्या शेतातील शेडात ही घटना घडली आहे. रवी बेळगावी हे यांच्या शेतात कुली म्हणून काम करत होते तो मृतक जोतिबा आणि मंजुळा सोबत या घरात रहात होता.