नजीर नदाफ नेता नव्हे वजीरराजकीय नेत्याचा बुरखा पांघरलेला माजी जिल्हापंचायत अध्यक्ष नजीर नदाफ नुसता नेता नव्हे तर अनेक काळ्या धंद्यातला वजीर होता. रविवार पासून एक मागोमाग एक धक्कादायक बातम्यांनी बेळगाव शहर हादरले आहे. छोटा शकील आणि रशीद मलबारी च्या बेळगावातील कारवायांची सूत्रे याच नजीरकडे होती ही त्यातलीच आणखी एक धक्कादायक बातमी बेळगाव live च्या हाती लागली आहे.
नजीर नदाफ चा राजकीय बुरखा आता फाटला आहे. सौदत्ती तालुक्यातील असुंडीचा नजीर काँग्रेस चा कार्यकर्ता आहे. जिल्हापंचायतीच्या निवडणुकीत निवडून आला आणि तो थेट अध्यक्षही झाला होता. नदाफ समाजाचा नेता ही त्याची आणखी एक ओळख, त्याचे अनेक उद्योगही आहेत.
रशीद मलबारीला स्थानिक राजकीय व्यक्ती, उद्योजक, व्यापारी आणि बिल्डरांची नावे त्यानेच काढून दिली असल्याचे पोलिसांना समजले आहे, इतकेच नव्हे तर त्याच्या असुंडी येथील फार्म हाऊस वरच अनेक कारवाया झाल्याचे व डॉन रशीद सहीत अन्य साथीदारांनी वास्तव्य केल्याचेही उघड झाले आहे.
Trending Now