Thursday, December 26, 2024

/

गोमटेश शेड विरोधात उद्या पासून आंदोलन

 belgaum

गोमटेश विद्यापीठाच्या अनधिकृत शेड बाबत मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री मुख्य सचिव सह सर्व मंत्री अधिकाऱ्यानी तक्रार करून देखील दुर्लक्ष केल्याने नगरसेवक सथायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे उध्या बुधवार पासून आर पी डी कॉर्नर वर आंदोलन करणार आहेत
बेळगाव येथील आरपीडी क्राॅस जवळ तंबू ठोकून ते आंदोलनाला बसणार आहेत. सकाळी दहा वाजता आंदोलन सुरू होईल असे त्यानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. बेळगाव दौर्यावर आलेले नगरविकासमंत्री रोशन बेग यांची मंगळवारी गुंजटकर यानी भेट घेतली व आंदोलनाची माहिती दिली. शेड हटविल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलन काळात जीवाला धोका निर्माण झाला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, आरपीडी क्राॅस जवळ रहदारीची समस्या निर्माण झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यानी दिला आहे. गुंजटकर हे रस्त्यावरच तंबू ठोकणार असल्यामुळे रहदारीची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.