कर्नाटकाचे नगरविकास मंत्री रोशन बेग आपल्या मतावर ठाम असून मराठी लोक प्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हटल्यास कार्रवाई तर करणारच शिवाय या कारवाई साठीच आम्ही नवीन विधेयक आणणार आहोत अशी भूमिका त्यांनी मांडली . मंगळवारी दुपारी त्यांनी बेळगाव महा पालिकेत हे वक्तव्य करत भूमिका मांडली आहे . पालिका आयुक्तांच्या कार्यालयात विकास आढावा बैठक घेतली .
मराठी नगरसेवकांना ताकीत देऊ असं म्हटलं होत मात्र या बैठकी कडे एकही नगरसेवक फिरकला नाही त्यामुळे केवळ अधिकाऱ्याची बैठक घेतली. बेग यांच्या विरोधात महाराष्ट्रात शिव सैनिकांनी निदर्शन केलं असल्याचं निदर्शास आणून दिल्या वर महाराष्ट्र सरकारला बस वर असे फलक लिहू नका मी पत्र लिहुन विनंती करणार असल्याचं देखील ते म्हणाले .
आम्ही सगळे भारतीय आहोत म्हणून तोंडाला येईल ते कुठल्याही राज्याच्या विरोधात घोषणा देणे योग्य नव्हे हे सगळं सरकार बघत असतंय कुणीही कर्नाटक बद्दल अनउदगार काढल्यास त्याच पद रद्द करणार आहोत अस ते म्हणाले . यावेळी उत्तर चेआमदार फिरोज सेठ पालिका आयुक्त शशिधर कुरे उपस्थित होते.
हालगा सांडपाणी प्रकल्पाची पाहणी
तत्पूर्वी सकाळी मंत्री रोशन बेग यांनी हलगा आलारवाड क्रॉस येथील संभावित सांडपाणी प्रकलपाची पाहणी केली आणी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या . भूसंपादन प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना त्रास देणार नाही असं ठोस आश्वासन यावेळी बेग यांनी दिल .