पूर्णपणे दोषयुक्त मतदार याद्या बनविण्यात आले आहेत. एक बेळगाव उत्तर मतदारसंघात २० हजारहून अधिक बोगस मतदार आहेत, राजकीय दबावातून बोगस नावे मतदार यादीत घुसविण्यात आली आहेत, असा आरोप अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदे द्वारे केला आहे.
कसाई गल्लीतील 2438 या एका सर्वे क्रमांकावर 389 मतदार आहेत, तेथे घरही नाही केवळ खुली जागा आहे, पडक्या घराची ही स्तिथी तर इतर ठिकाणी काय असणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
बोगस सर्वे नंबरचे उतारे मागितले असता ते देण्यात आले नाहीत. शिवाय माजी सनदी अधिकारी मंडळींची नावेही कायम ठेवण्यात आली आहेत.
या प्रकाराची 1 जून पर्यंत चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला
या अगोदर बेळगावात सेवा बजावून बदली झालेले आय जी पी राघवेंद्र औरादकर, जिल्हाधिकारी अजय नागभूषण, एकरूप कौर, पोलीस अधीक्षक चंद्रगुप्त , निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार तोरगल यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची नाव देखील मतदारयादीत नाव कायम ठेवण्यात आली आहेत हा प्रकार गंभीर आहे असं देखील बेनके म्हणाले.
बोगस मतदार यादी बनवणे हे राजकीय प्रेरित असून यात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार झाला आहे याच्या मागे उत्तर भागातील लोक प्रतिनिधी आहेत असा थेट आरोप त्यांनी केला बेळगाव शहरात सध्या बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चर्चेत आहे या बोगस नावात बांगलादेशी ची नाव आहेत का याचा तपास देखील पोलिसांनी करावा आम्ही सर्व माहिती देण्यास तयार आहेअसेही ते म्हणाले. महा पालिका निवडणुकीत एका वार्डात जय पराजयच अंतर 100 मत इतका फरक असतो मात्र एका कसाई गल्लीतील घरात ज्या ठिकाणी घर नाही तिथे 389 मत बोगस आहेत त्यामुळं याचा पूर्ण तपास झाला पाहिजे अशी मागणी देखील बेनके यांनी केली.यावेळी राजू भातकांडे उपस्थित होते बोगस मतदार यादी विरोधातील आंदोलन भाजप म्हणून नाही तर वकिल म्हणून करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं