येथील पाश्चापुर चा विध्यार्थी आणि जन्मजात अंध असलेल्या करेप्पा बाळू सिदल्याळ याने बारावीत ९३.८३ टक्के गुण मिळविले आहेत. ६०० पैकी ५६३ गुण त्याला मिळाले.
तो येथील लिंगराज कॉलेज चा विध्यार्थी आहे.अतिशय गरीब कुटुंब, वडील लहानपणीच वारलेले, अशात मोबाईलवर रेकॉर्ड केलेले संदेश ऐकून तो शिकला,आणि डोळे असलेल्यांनाही जे अवघड जाते तितके घवघवीत यश त्याने मिळविले आहे.