बेळगाव वर संकट बांगलादेशी घुसखोरांचेबेळगावात शुक्रवारी सात बांगलादेशी घुसखोरांवर अटकेची कारवाई झाली.ते बनावट पासपोर्ट करण्याच्या प्रयत्नात सापडले, कारण आजही याचप्रकारचे २०० हुन अधिक घुसखोर ऑटोनगर परिसरात वास्तव्यास आहेत. या घुसखोरांचे संकट बेळगावकरांसमोर घोंघावत असताना पोलीस तर सोडाच महागरपालिकेचेही दुर्लक्ष झाले आहे.
हे घुसखोर खास आणले गेले आहेत. ऑटोनगर परिसरात बेकायदेशीर रित्या चालविल्या जात असलेल्या व्यवसायांसाठी त्यांची अनधिकृत आयात झाली आहे. स्वतःचे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी एका लोकप्रतिनिधी ने समांतर व्होट बँक तयार करण्यासाठी त्यांचा वापर करून घेतला जाणार आहे. ही माहिती धक्कादायक आहे, या भागात राहणाऱ्या स्थानिकांशी पोलिसांनी विश्वासाने वागण्याचा प्रयत्न केल्यास ती अधिकृतरित्या बाहेर पडेल, पोलीस आपली नावे गुप्त ठेवणार नाहीत, त्या राजकीय व्यक्तीला सांगतील अशी भीती या भागातील स्थानिकांच्या मनात आहे.
विदेशातील कोणत्याही ठिकाणी पासपोर्ट नसताना साधा प्रवेश मिळत नाही, वास्तव्याचा तर प्रश्नच येत नाही, मात्र आपल्या भारतात घुसखोरीच्या साऱ्या संधी आहेत. बेळगाव असो किंवा दुसरे कुठलेही शहर तेथील राजकारणीच कुंपणाचे काम न करता शेत खाऊ लागले तर अशा संधी मिळणारच. पोलिसांनी या दृष्टीने तपास केला तर घुसखोर, त्यांना काम देणारे अनधिकृत कारखानदार आणि त्यांचे आश्रयदाते या सगळ्यांचाच माग काढणे सोपे होईल.
बेळगाव हे नेहमीच परप्रांतीय आणि परदेशी गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. यापूर्वी झालेल्या अनेक कारवाईत हे स्पष्ट झाले आहे. काही गुन्हेगारांनी तर बेळगावात स्फोट घडवून आणण्याचेही प्रयत्न केले आहेत. यावेळीही आगामी निवडणुकांच्या तोंडावर तसे प्रकार होऊ शकतात, धोके नाकारता येणार नाहीत. ही राजकारणी मंडळी आशा घुसखोरांना रेशन, आधार आणि मतदान कार्ड काढून देण्या आधीच कुणीतरी हा प्रकार रोखला पाहिजे.