बेळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सतीश जारकीहोळी आणि विध्यमान पालकमंत्री रमेश जारकीहोळी या दोघांत गेले एक वर्ष रंगत आलेला कलगीतुरा अखेर संपला असून खुद्द मुख्यमंत्र्या समक्ष दोघांत दिल जमाई झाली आहे.
माजी मंत्री सतीश यांनी राजीनामा दिल्या नंतर दोघा भावात बराच कलगीतुरा रंगला होता एकमेकां विरोधात वक्तव्ये केली जात होती.
सोमवारी बंगळुरू प्रदेश काँग्रेस कार्यालयात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्य प्रभारी वेणूगोपाल, के पी सी सी अध्यक्ष जी परमेश्वर यांनी मध्यस्थी करून दोघं भावातील वाद मिटविला त्यानंतर दोघांनी हस्तालोंदन केलं. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोघा बंधूंना बेळगाव जिल्ह्यात एकत्रित काम करून जास्तीत जास्त जागा निवडून आणा अस आवाहन केलं.
दोन्ही जारकीहोळी बंधुंच वाकयुद्ध बंद होणार असल्याने जिल्ह्यात काँग्रेस साठी आणि जारकीहोळी समर्थकां साठी अच्छे दिन येतील का? हा प्रश्न आहे