समिती नेते किरण ठाकूर यांनी मराठीच्या मुद्दयावर आक्रमक होत जिल्हाधिकारी एन जयराम यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत खडे बोल सुनावले होते यामुळे तीळपापड झालेल्या कानडी संघटनांनी ठाकूर यांच्या विरोधात थटथयाट केला.
भाषिक अल्पसंख्यांक कायद्यांनुसार मराठीत परीपत्रिक देणार असे जिल्हाधिकारी जयराम यांनी आश्वासन दिल्या नंतर सोमवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते
ठाकूर यांनी राजकारण सोडावं त्यांना आय ए एस अधिकाऱ्या बरोबर बोलायचे सौजन्य नाही हवं तर उत्तर मतदार संघातून विधान सभा लढवावी त्यांना कन्नड जनता धडा शिकवेल असे आव्हान कन्नड नेते अशोक चंदरगीनी दिले .माजी महापौर सिद्दनगौडा पाटील यांच्या सह मूठभर कन्नड नेत्यांनी या सभेस हजेरी लावली होती.
मराठी नेत्यां विरोधात वक्तव्य केल्याने जिल्हाधिकारी एन जयराम यांचा अभिनंदनाचा ठराव देखील या बैठकीत मांडण्यात आला आगामी आणखी एक वर्ष जयराम यांची बदली केली जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करत बदली झाल्यास तीव्र आंदोलनाची दरपोक्ती देखील मूठभर कन्नड नेत्यांनी केली. सीमा भागाचे मुखपत्र असलेल्या मराठी भाषिकांचा आधार असलेल्या मराठी दैनिक तरुण भारत वर देखील आगपाखड या बैठकीत करण्यात आली.