Wednesday, January 1, 2025

/

शिवसृष्टी उद्या होणार उदघाटनाने खुली

 belgaum

 

प्रशासनाची वाढती चालढकल , राजकारण आणि बुडाच्या अधिकाऱ्यांचा वेळकाढुपणा यामुळं रखडलेलय शिव सृष्टीचं उदघाटन उद्या शुक्रवारी अक्षय तृतीयेस होणार हे नक्की झालं आहे.सार्वजनिक बांधकाम खाते स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर हे या उदघाटनासाठी अहोरात्र झटत आहेत.सर्व मूर्ती रंगविण्याचं काम पूर्ण झालं असून कृत्रिम लॉन (ग्रास) बसविण्यात येत आहे .गुरुवारी रात्रभर हे काम सुरू असून नगरसेवक गुंजटकर हे रात्री स्वतः जातीने हजर राहून काम पूर्ण करवून घेत आहेत.

सकाळी 9 वाजता शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच पूजन, सकाळी 11 वाजता पाळणा तर सायंकाळी 4 वाजता उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची गरज आहे.Shiv srishti

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.