वडगाव स्मशानभूमितील जळालेल्या चितेची राख विस्कटून ती गायब केल्याचा प्रकार घडला आहे. राखेतील अस्थींच्या एकंदर रचनेवरून हा जादूटोण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
एक तरुण अपघातात दगावला. त्याचे अंत्यसंस्कार झाले होते, सोमवारी रक्षाविसर्जन होणार होते. त्यावेळी दाखल झालेल्या नातेवाईकांना विचित्र अनुभव आला. राख गायब तर अस्थी विचित्र प्रकारे रचल्याचे दिसून आले राखेच्या ठिकाणी गुलाल झाडू वगैरे ठेवण्यात आली होती काही मंडळी येथून राख घेऊन जात असतानाही पाहण्यात आल्याचे समजते.
आता स्मशान भूमीतील राखही सुरक्षित नसल्याचे उघड होत आहे. त्या मयताच्या नातेवाईकांनी याबद्दल संताप मांडला आहे.स्मशान भूमीत महा पालिकेचा कर्मचारी नियुक्त केला असला तरी तो 24 तास कामावर असत नाही त्यामुळे वडगाव स्मशानभूमीत अनेक गैर प्रकारांना ऊत आला आहे. या भागातील नगरसेवकांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.