Sunday, July 14, 2024

/

लाल बत्ती विरुद्ध भिमाप्पा गडाद यांचा पुन्हा यलगार ….

 belgaum

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या गाडीवरील लाल बत्ती काढण्याचा निर्णयास कॅबिनेट मध्ये मंजुरी दिली आहे असं असताना जर एक मे रोजी पर्यंत राज्यातील सर्व मंत्री आणि लाल दिवा वापरणाऱ्या अधिकाऱ्यानी लाल बत्ती काढली नाही तर एक ऐवजी 25 खाजगी गाड्यांना लाल दिवा लावून आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
गेल्या 15 नोव्हेम्बर 2016 पासून आर टी आय कार्यकर्ते गडाद यांनी बेकायदेशीर लाल दिव्या विरोधात स्वतःच्या गाडीला लाल दिवा बसवत आंदोलन सुरु केल होत. मंगळवारी त्यांनी आपल्या गाडीवर आंदोलन म्हणून बसवलेला लाल दिवा काढला आहे.त्यावेळी आर टी आय मधून माहिती मिळवत बेकायदेशीर लाल दिवे हटविन्यासाठी पुढं सरसावले होते

Red light
कर्नाटकात  विरोधी पक्ष नेते  जगदीश  शेट्टर ,  भाजपचे  माजी मंत्री  के एस ईश्वरप्पा   सत्ताधारी  काँग्रेस पक्षाचे नेते सी एम इब्राहिम यांच्यासह अनेक  शासकीय अधिकारी बेकायदेशीर  रित्या आपल्या वाहना वर लाल दिवा  वापरतात  . सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आणि माहिती अधिकारातून त्यांनी हि माहिती मिळवली होती जो पर्यंत हे सर्व लोक प्रतिनिधी आणि अधीकारी आपल्या वाहना वरील लाल दिवा हटवत नाही तो पर्यंत आपणही आपल्या  गाडी ला लाल  दिवा लाऊन अस म्हणत तब्बल पाच महिने लाल दिवा वापरला होता.

जिल्हाधिकारी कार्यालया समोर सर्व पत्रकारां समक्ष भिमाप्पा यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या गाडीवरील दिवा काढला आहे काही मंत्री आणि अधिकारी अजूनही लाल बत्ती वापरून राज शिष्टाचाराच उल्लंघन करत आहेत म्हणून मी एक मे पासून 25 खाजगी गाड्यांना लाल दिवा लाऊन आंदोलन करणार आहे असे गडाद म्हणाले.गेल्या सहा महिन्यात मी कर्नाटकासह महाराष्ट्र गोवा आणि गुजरात राज्यात फिरलो मात्र कोणीही माझी गाडी अडविली नाही असंही गडाद म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.