Thursday, January 9, 2025

/

वडगावमधील मोटेचा तलाव म्हणजे अतिक्रमणाचे कुरण…….!

 belgaum

वडगांव मंगाई मंदीर पासून पुढे सर्व पिकाऊ शेती होती आणी त्याला पाणी पुरवण्यासाठी एक मोठा तलाव होता त्यात बारमाही पाणी असायचे म्हणून दक्षिणेकडे शेतीला पाणी पुरवण्यासाठी मुस होती आणी त्यातून पाणी जाने बंद झाले कि शेतकरी मोटेने पाणी खेचत अशी त्यावेळच्या सरकारने शेतकऱ्यांना सोय करुन दिली होती अस समजत.पण आता त्या तलावाच्या आजुबाजुला बरीच बेकायदेशीर लोकवस्ती झाले आणी त्याला मंगाई नगर असे नाव ठेवलय.पण तलावाची हद्द मनपाने आधीच निश्चित करुन न ठेवल्याने आजुबाजुच्या लोकांनी घरे बांधताना अक्षरशः तलावात भराव टाकून अतिक्रमण चारी बाजूनी झालय हे प्रत्यक्ष पाहिल्यावर कळत.बाजूला असणार्या वडार समाजाने आपले ट्रॅक्टर,स्लॅबचे व इतर सामान भराव टाकून तिथे ठेवलय तसच कांही जनानी पाळीवर घर तर बाजूच्या जागा मालकांनी आपली जागा विकून पाळी सपाट करुन रस्ता तयार केला आहे असे बरेच अतिक्रमण झालेल पाहून संबधितानी याकडे दुर्लक्षच केल्याने त्याची बेनिगा झाली आहे.

याभागातील कोणीही लोकप्रतिनीधी अथवा अधिकाऱ्यानी जाणीवपुर्वक लक्ष दिल नाही हे यावरुन कळून येत.अशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अस वाटू लागलय कि आम्ही जे सांभाळल ते मनपाला सांभाळून त्याच परिवर्तन करुन पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रकल्प राबवला असता तर आजुबाजुच्या घरातील विहीरीनां पाणी तर कमी पडल नसत.पण तेवढी मानसिकतातर हवी ना ?
असो निदान आतातरी या दुर्लक्षीत व अतिक्रमण होणार्या तलावाकडे संबधितानी गांभिर्याने लक्ष देऊन तलावाची हद्द निश्चित करुन जे अतिक्रमण झालय ते काढून टाकण्यासाठी प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून तिथे बस्तान बांधलेल्यानां अद्दल घडवत शेतकऱ्यांना अन्नास लावलेल्या तलावाचे संरक्षण करुन जुन्या आठवणी सांभाळाव्यात असे मनोमन परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.अन्यथा आम्हालाच त्यासाठी आंदोलन कराव लागाव ही दुर्दैव नसेल तर काय ? कारण आता शहरी शेतकऱ्यांचा कोन कैवारीच उरला नाही अस वेळोवेळी शेतकरी आंदोलनं करत असतानां दिसून येतय पण हेच मोठमोठी आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी जनतेसमोर गेल्यास शेतकरी नक्कीच पायतान हातात घेतील यात तिळमात्र शंका नाही.

बातमी लेखन-राजू मरवे Vadgaon lake

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.