बेळगाव च्या युवकाने तयार केलेल्या ढोल ताशा पथकाचा आवाज दुबईत घुमणार आहे.सागर पाटील असं या युवकाचं नाव असुन त्याने 2016 साली त्रिविकारम नावाचे ढोल ताशा पथक बनवले होते. सागर हा संगीतकार असून स्वतः गाणी कम्पोज करतो त्यान आपलं live बँड देखील बनवलं आहे.
त्रिविकारम हे स्थानिक दुबईतील पहिलं ढोल असून दुबई आणि संयुक्त अरब अमिराती अनिवासी भारतीयांना ढोल ताशांच्या आवाजानं मंत्रमुग्ध करणार आहे.
विदेशात राहणारे भारतीय नेहमीच मराठी संस्कृती आणि जल्लोष नेहमीच मिस करत असतात त्रिविकारम ढोल ताशा पथकामुळे हुबेहूब मराठमोळा जल्लोष दुबईत अनुभवायला मिळणार आहे. या ढोल पथकां साठी वेगवेगळ्या वयातील स्थानिक कलाकारांना घेऊन टीम बनविण्यात आली आहे. नऊ वारी साडी कुर्ता आणि फेटा परिधान करून हे कलाकार परफॉर्मन्स करणार आहेत.
संयुक्त अरब अमिराती आणि दुबईतील भारतीयांना विदेशात देखील पूर्वी अनुभवलेल्या गणेश चतुर्थी मिरवणुकीचा जल्लोष आनंद घेता यावा प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे त्याने सांगितले.
सागर पाटील हा बेळगाव चा सुपुत्र असून टिळकवाडी चा रहिवाशी आहे त्याचं वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक मध्ये शिक्षण झालं आहे सध्या तो गेली 6 वर्ष दुबईत वास्तव्यास आहे. दुबईतील लॉजिस्टिस कम्पनी सहाय्यक मॅनेजर म्हणुन कार्यरत असून दुबईत संगीत क्षेत्रात कार्यरत असतात.अरेबिक संगीत,आंतर राष्ट्रीय इंग्लिश शॉर्ट फिल्म बनवत असतात. भारतीय टी व्ही प्रोडक्शन साठी देखील काम करतात
दुबईत live संगीत बँड निर्माण केलं आहे.आता त्रिविकारम हे दुबईतील पाहिलं ढोल पथक बनविले आहे.
दुबईच्या इतिहासात सर्वप्रथम 7 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता त्रिविकारम ढोल पथकाचा पहिला शो होणार आहे.दुबईतील इंडिया पॅव्हेलीयन ग्लोबल व्हिलेज इंडिया पॅव्हेव्हेलियन कल्चरल स्टेज या ठिकाणी पहिला live शो होणार आहे. यानंतर 8 वाजता ग्लोबल परेड या ठिकाणी एक शो होणार आहे