28 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेस शिव जयंती ला शिव सृष्टीचं उदघाटन होण्याच स्वप्न आता धूसर झालं असून शिव सृष्टी दुरुस्ती साठी बुडा ने नवीन टेंडर मागविले आहे.
शिवाजी उद्यानातील शिव सृष्टीत लेजर फाऊंटन ची सुविधा डी एम एक्स लाईट सुविधा लावण्यासाठी बुडा ने नवीन मागविलेले टेंडर 10 मे 2017 ला खुले होणार आहेत त्यानंतर हे काम सुरू होणार असल्यानं आता अक्षय तृतियेस होणार शिव सृष्टीचं उदघाटन होणं धूसर झालं आहे.
या नवीन टेंडर नुसार 14 लाख 76 हजार 220 रुपये दुरुस्ती साठी तर पूर्ण शिव सृष्टीच्या कामाची एकूण किंमत 24 लाख 60 हजार 600 रुपये आहे. गेली कित्येक वर्षे अपूर्ण असलेलं शिव सृष्टीचं काम उदघाटन पूर्ण करा या मागणी साठी अनेक संघटनांनी आंदोलन केलं होतं याविषयात राजकरण होत असल्याचा आरोप केला होता लोकांनी स्वतः उदघाटन करणार असल्याचा इशारा दिला होता आता नवीन टेंडर झाल्याने शिव जयंती उदघाटन अक्षय तृतियेस होणार नाही हे सिद्ध झालं आहे.