माजी आमदार आणि कै वसंतराव पाटील यांच्या निधनानंतर रिक्त असलेलं मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच अध्यक्ष पदी दीपक दळवी यांची निवड करण्यात आली असून पहिल्यांदाच मध्यवर्तीत कार्याध्यक्ष पद ठेवण्यात आलं आहे मनोहर किणेकर यांची कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सोमवारी ज्योती कॉलेज मध्ये मध्यवर्ती बैठक झाली यावेळी ही निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते एन डी पाटील होते . मध्यवर्ती च्या सरचिटणीस पदी मालोजी अष्टेकर आणि खजिनदार पदी प्रकाश मरगाळे यांना कायम ठेवण्यात आले आहे. उपाध्यक्ष पदी निंगोजी हुद्दार,दिगंबर पाटील,जयराम मिरजकर, रामदास राठोड यांनी निवड करण्यात आली आहे.
पुढील आठवड्यात एकूण 8 नवीन नेमलेल्या सह वकील भाषा तज्ञ, आर्थिक तज्ञ आणि सीमा विशेषज्ञ बैठक होणार असून कोर्टाच्या कामकाजाला गती येईल अशी माहिती एन डी पाटील यांनी दिली आहे.
बेळगाव live चा आवाज ऐकला
बेळगाव live ने मध्यवर्ती अध्यक्षांचा मुहूर्त कधी ?या मथळ्याखाली खाली अनेकदा बातमी लाऊन धरली होती. सोशल मीडियावर देखील याची चर्चा झाली होती . पुढील विधानसभा नगर सेवक निवडणुका साठी अध्यक्ष निवडीची गरज होती त्यामुळं दळवी यांची निवड झाल्याने कोर्ट कामकाज आणि इतर निर्णया घेण्यास गती मिळणार आहे.
Khupach Chan zhal