उत्तर भाजपात अनेक जण विधान सभेची निवडणूक लढण्यास गुडग्याला बाशिंग बांधुन तयार आहेत त्यातील पेशाने डॉक्टर असलेल्या नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बराच वाद निर्माण झाला होता.
उपनगरात आयोजित आरोग्य शिबिरात भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रमाचं आयोजन का केलात असा जाब विचारत कार्यकर्त्यांनी बराच काळ गोंधळ घातला पक्षाच्या सोडून एका हिंदुत्व वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन कमळ ची पोस्टर का लावला असा देखील आक्षेप घेत गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. गोंधळ घातलेल्या भाजपच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी डॉक्टर नेत्याची माफी मागावी असे फोन हिंदू संघटनेच्या नेत्याकडून करण्यात येत होते .
हिंदू संघटनेला सोबत घेऊन कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर नेत्यास पक्षातून जोरदार विरोधाचा सामना करावा लागत आहे ,
भाजप पक्षात इच्छुकांची गर्दी वाढत आहे, राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन अनेकजण आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नात आहेत, सध्या खासदारआणि माजी आमदार असलेल्या दोन नेत्यानी या डॉक्टरला पुढे केल्याची चर्चा आहे, यामुळे पक्षात राबलेल्या निष्टावानांची गळचेपी होत आहे, त्याचा संतापही बाहेर येत आहे.