राजकारण होत असल्यानं रखडलेलं शिवसृष्टीचं उदघाटन 28 एप्रिल च्या आत पूर्ण करा अशी सूचना आमदार संभाजी पाटील यांनी बुडा आणि पालिका आयुक्तांना दिली आहे. गुरुवारी सकाळी आमदार संभाजी पाटील, गट नेते पंढरी परब,बुडाआयुक्त शकील अहमद व पालिका आयुक्त आदींनी शिव सृष्टीची पाहणी केली . शिव सृष्टी ची निर्मिती होऊन तीन वर्षांहुन अधिक काळ लोटला तरी उदघाटन करण्यास विलंब होत असल्याने या शिव जयंती उत्सवात शिवसृष्टीचे उदघाटन न झाल्यास शिव प्रतिष्ठान शिव प्रेमीनी सामान्य लोकांनीच उदघाटन करू असा इशारा दिला होता.याच उदघाटनात श्रेयासाठी राजकारण होत असल्यानं शिव सृष्टी उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
गुरुवारी आमदारासह अधिकाऱ्यानी पहाणी केली. शिवसृष्टीत निकृष्ठ दर्जाच्या टाइल्स बदलणे, फॉउंटन आणि ध्वनी च काम पूर्ण करून घयायचं आहे. फौंटन साठी 25 लाख आणि ध्वनीसाठी 15 लाखाचा टेंडर पुणे येथील ठेकेदारास देण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत राजकारण करणे चुकीचं आहे.बुडा आयुक्त शकील अहमद याकामी सहकार्य करत आहेत पालिकेच्या अधिकार्यानी देखील सहकार्य करावं आम्ही काहीही करून या शिव जयंतीत शिव सृष्टीचं उदघाटन करू अशी प्रतिक्रिया गट नेते पंढरी परब यांनी दिली.