शिव सृष्टीसाठी मराठी नगरसेवक शिव प्रतिष्ठान आणि शिव प्रेमी संघटना सोबत आता काँग्रेस मधील मराठा समाजाचे नेते पुढे सरसावले आहेत.प्रशासन शिवाजी उध्यान इथे निर्मित केलेल्या शिव सृष्टी चे उदघाटन करण्यास टाळा करत आहे यात श्रेया साठी राजकारण चाललय हे चुकीचं असून त्वरित शिव जयंती अक्षय्यतृयीयेच्या अगोदर उदघाटन करा अशी मागणी बुडा आयुक्तांना करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटाम्बळे, जयराज हलगेकर, रमेश गोरल,विशाल पाटील आदी उपस्थित होते