Tuesday, December 24, 2024

/

त्यांच्या वेळेने त्यांना खेचून नेले…..

 belgaum

काळ आणि वेळ एकत्र आली की मृत्यू व शेवट होणे थांबत नाही असे म्हणतात.त्या दुर्दैवी ८ जणांबद्दल असेच म्हणावे लागेल. मराठा मंडळ अभियांत्रिकी कॉलेजच्या त्या समूहाने केवळ आपला शीण घालवण्यासाठी मालवणच्या वायरी समुद्र किनाऱ्यावर जाणे आणि एकूण ४९ जनांपैकी ११ जणांवर काळाने झडप घालून ८ जणांना गिळून टाकणे ही घटना मृत्यू आला की तो कसाही खेचून घेतो याचेच उदाहरण आहे.

mm-malwan
४४ मुले, ३ मुली आणि एक पुरुष व एक महिला असे दोन प्राध्यापक असा समूह पुण्याला औद्योगिक सहलीला गेला होता. तेथून सरळ बेळगावला येणे ही त्यांची जबाबदारी. आणि वाट चुकवून मालवण कडे जाणे हा तसा आगाऊपणाच. सध्या सर्वत्र हेच म्हणणे आहे की त्यांनी तेथे जायला नको होते. कॉलेजच्या प्रचार्यांनी तर जाहीरपणे सांगितले की आम्ही मनोरंजक सहलीला परवानगी दिली नव्हती, ते विनापरवाना गेले होते, ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी व्हायचा आहे तेथे ती व्यक्ती आपोआप खेचली जाते, हेच या घटनेने दाखवून दिले नसेल का? हे दुर्दैवी वास्तव साऱ्यांनीच लक्षात घ्यायला नको का?
मालवणात काही मुले बुडाली, हि बातमी जेंव्हा बाहेर आली आणि वादळासारखी पसरली, ती मुले बेळगावच्या मराठा मंडळाची असे जेंव्हा कळले तेंव्हाही ती मुले आपली असतील असे त्यांच्या पालकांनाही वाटले नव्हते, आपली मुले अभ्यासाच्या सहलीसाठी पुण्याला गेली आहेत असे म्हणत त्यांचे पालक निर्धास्थ होते, मात्र जेंव्हा एकापाठोपाठ नावे बाहेर पडली तेंव्हा पालकांसहं साऱ्यांसाठीच तो एक मोठा धक्का ठरला, आता तर त्यांची शुद्धही हरपली आहे, आपापल्या मुलांनी चूक केली असे त्यांनाही वाटत असेल मात्र काळ आणि वेळे पुढे कुणाचे चालत नाही हे सत्य त्यांनाही पचवावेच लागणार आहे.
जी गेली ती सळसळत्या रक्ताची मुले होती. वाचली तीही तशीच आहेत .प्राद्यापकांसमोर त्यांनी आग्रह धरला असेल त्यातून जे व्हायचे नव्हते ते झाले असे म्हणून त्यांना दोष द्यायचा की मृत्यूच्या तांडवातील एका सत्याला सामोरे जायचे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.