फोटो ग्राफर वाय. जी. बिरादार यांच्या ‘नेचर करिश्मा’ या अनोख्या चित्राचे प्रदर्शन शाहू स्मारक कोल्हापूर येथे भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन खा. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन पाहणी केली. समुद्राच्या भरती, ओहोटीवेळी काठावर पाणी आणि वाळूपासून ज्या प्रतिकृती तयार होतात त्यांचे अनोखे छायाचित्र घेऊन हे प्रदर्शन भरवण्यात आल आहे. प्रदर्शन ८ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते ८ या वेळेत पाहण्यासाठी खुले राहणार आहे.
यावेळी बोलताना खा. संभाजीराजे म्हणाले, हा एक नाविन्यपूर्ण संकल्प आहे. यातून एक नवी कला समोर आली आहे. या कलेचा वापर करून बीरादर यांनी आपले नाव जगाच्या पातळीवर न्यावे आणि त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. या प्रदर्शनात बिरादर यांनी आपल्या टिपलेल्या ५० वैशिठ्यपूर्ण छायाचित्रांना या प्रदर्शनात ठेवण्यात आले. तरी कलाप्रेमिंनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बिरादर यांनी यावेळी केले. यावेळी चित्रकार अजय दळवी, विजय टिपुगडे, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णात हिरुगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.