दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, अशा वेळी सामाजिक सेवेचे भान व मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेऊन जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन, रोटरी क्लब, भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या वतीने बेळगाव शहरातील ट्रॅफिक पोलीसाना पिण्याच्या पाण्याचे जार आणि गॉगल वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कार्यक्रम आज ता 24 रोजी चन्नमा चौकात सकाळी 11-30 वाजता झाला, या कार्यक्रमासाठी डीसीपी जी राधिका, ट्रॅफिक एसीपी शंकर मारिहाळ, ट्रॅफिक दक्षिणचे सीपीआय धर्मट्टी, ट्रॅफिक उत्तरचे सीपीआय जावेद मुशाफिरी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत जायंट्स मेन चे अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले,
आपली सेवा बजावत असताना ट्रॅफिक पोलिसांना दिवसभर उन्हात उभे राहून सेवा करावी लागते, अशा वेळी त्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे खूप गरजेचे आहे.
यासाठी जायंट्स मेन च्या वतीने आज ता 24 रोजी बेळगाव शहरातील 10 चौकात सेवा बजावणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली,
त्याचप्रमाणे रोटरी क्लबच्या वतीने ट्रॅफिक पोलिसांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून रोटेरियन विकास जैन यांच्यावतीने 40 ट्रॅफिक पोलिसांना गॉगल चे वितरण ही याच ठिकाणी करण्यात आले.
रोज लागणाऱ्या पाण्याची जबाबदारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष सुजित मुळगुंद व प्रतीक गुरव यांनी स्वीकारली आहे.
या कार्यक्रमासाठी नगरसेविका सरला हेरेकर, जायंट्सचे सेक्रेटरी महादेव पाटील, मदन बामणे, उपाध्यक्ष अशोक हलगेकर, मोहन कारेकर, अरुण काळे, पुंडलिक पावशे, मधु बेळगावकर व जायंट्स चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते,
बातमी लेखन-महादेव पाटील