अचानक झाडाची फांदी कोसळल्याने दुचाकी वर पाठीमाग बसलेल्या महिलेला जीव गमवावा लागला आहे. मेघा मारुती पाटील वय 24 वर्ष राहणार कोरे गल्ली शहापुर अस या मृतक दुर्दैवी महिलेचं नाव असून त्यांचे पती मारुती पाटील आणि याच दुचाकी वर बसलेला दोन वर्षाची मुलगी सुखरूप बचावली आहे.
गोवावेस बसवेश्वर सर्कल जवळील अग्निशामक दलाच्या कार्यालया च्या जवळ मंगळवारी सायंकाळी सदर घटना घडली आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार मारुती पाटील हे आपल्या दुचाकीवरून बसवेश्वर सर्कल कडून मराठा मंदिरकडे अग्निशामक दलाच्या बाजूने येत होते त्यावेळी झाडाची फांदी तुटून दुचाकीवर मागे बसलेल्या मेघा यांच्या डोकीवर कोसळली यात मेघा जागीच मागच्या माग खाली कोसळल्या गाडी बराच अंतर दूर गेल्यावर मारुती यांना याची कल्पना आली . या घटनेत मेघा यांच्या डोकीला जबर मार लागला होता त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी त्यांचा मृत्यू झाला.मारुती पाटील आपल्या पत्नी मुलासह मराठा मंदिर समोरील मारुती मंदिरात महा प्रसाद घेण्यासाठी जात होते. मृतक मेघा या गरोदर होत्या अशी देखील माहिती मिळाली आहे. मारुती हे सोनार काम करतात शिरसी जवळ त्यांचं मूळ गाव असून ते कोरे गल्ली शहापूर येथे राहत होते . टिळकवाडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे