बेळगावात होणारी शिवजयंती मिरवणूक सायंकाळी सात वाजता सुरु करून रात्री एक वाजेपर्यंत संपवा अशी सूचना पोलीस उपायुक्त जी राधिका यांनी दिली आहे . पोलीस समुदाय भवनात आयोजित शिव बसव जयंती शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केली आहे.
यावेळी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी, मध्यवर्ती शिवजयंती अध्यक्ष दीपक दळवी, विकास कलघटगी, मालोजी अष्टेकर प्रकाश मरगाळे ,नेताजी जाधव ,मदन बामणे ,सुनील जाधव, गणेश दड्डीकर आदी उपस्थित होते.
मिरवणूक मार्गात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची पुरेपूर दक्षता पोलीस दलाने घेतली असून २५० सी सी टी व्ही कॅमरे मिरवणूक मार्गात बसविणार असून मुख्य मार्गासह बोळातून देखील कॅमेऱ्याची नजर असणार आहे यासाठी हेस्कोम विभागाचे सहकार्य घटले जाणार असून भंगी बोळातून लाईट ची सोय देखील केली जाणार आहे अशी माहिती देखील राधिका यांनी दिली आहे .
मिरवणुकी दिवशी दारू बंदी करण्याचे आदेश दिले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नसून डॉल्बी लावणाऱ्या मंडळावर कारवाई करू स इशारा देखील राधिका यांनी यावेळी दिला. यावेळी शिव जयंती मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी विचार व्यक्त करून पोलीस दलास अनेक सूचना केल्या .