वाढीव घरपट्टी लोकांना जाचक होणार असून याचा त्रास सर्व सामान्य जनतेस होणार आहे त्यामुळे जरी हा घरपट्टी वाढीचा निर्णय प्रशासकीय असला तरी जनतेला ताप होऊ नये यासाठी सभागृहात घरपट्टी वाढीव मूळ त्रास होत असल्याचा ठराव करून जनतेच्या निदर्शनास आणुन द्या शासनाला पाठवुन द्या असा सल्ला माजी नगरसेवक संघटनेनं महापौर संज्योत बांदेकर यांना दिला आहे.
मंगळवारी पालिका कार्यालयात माजी नगरसेवक संघटनेचं शिष्टमंडळ महापौरांना भेटलं आणि त्यांनी घरपट्टी वाढीस विरोध केला आहे. यावेळी महापौर आणि नगरसेवक किरण सायनाक यांच्यासोबत चर्चा झाली माजी नगर सेवक संघटनेच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
घरपट्टी सोबत पालिकेने पाणी पट्टी वाढीचा निर्णय घेतला असून तीन वर्षातून एकदा पाणी पट्टी वाढ करावं अशी कोणतीच कायद्यात तरतूद नसून पाणी पट्टी वाढ कमी करावी
जनतेला विश्वासात घेऊनच शहरात मास्टर प्लॅन मोहीम राबवा आणि पीडितांना त्वरित नुकसान भरपाई द्या
पालिकेतील नगरसेवक पदाचे अधिकार कमी व्हायला देऊ नका आमदार आणि अधिकाऱ्यांना हावी होऊ नये याची काळजी घ्या
कणबरगी सिद्धेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेला कत्तल खाण्याचा परवाना रद्द करा सिद्धेश्वर मंदिर हिंदूंचे आराध्य दैवत आहे त्यामुळे भावना दुखू नये याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी
पावसाळ्या सुरू पूर्वी शहरातील नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण साफसफाई काम पूर्ण करा
समस्या निवारणार्थ महापौरांच्या अध्यक्षतेखाली माजी नगरसेवक माजी महापौर उपमहापौर आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवा अशी मागणी करण्यात आली आहे .
आगामी 20 किंवा 21 एप्रिल रोजी माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊ अस आश्वासन महापौर संज्योत बांदेकर यांनी दिल . माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष वकील नागेश सातेरी, सिद्दनगौडा पाटील, गोविंद राऊत,शिवाजी सुंठकर, एन बी निर्वाणी, वंदना बेळगुंदकर,नेताजी जाधव,कल्लाप्प प्रधान,दीपक वाघेला, आदी उपस्थित होते