कर्नाटकासाठी महाराष्ट्राकडून दोन टी एम सी पाण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी तांत्रिक अडचणी आल्या आहेत महाराष्ट्राकडून पाणी मागण्यासाठी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात शिष्टमंडळ जाणार असून याकामी जलसंपादन विभाग हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे अशी माहिती जलसंपादन खात्याचे सचिव राकेश सिंह यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी अधिकारी म्हणुन राकेश सिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची दुष्काळ आणि विकास आढावा बैठक घेतली .
क्षीर भाग्य योजनेतील दुधाची पाकीट बेकायदेशीर रित्या मार्केट मध्ये विकायला मुलांच्याम पोटात जाण्या ऐवजी मार्केट मध्ये विकायला येणे दुर्दैवी असून याची अधिकाऱयांनी चौकशी करावी असे आदेश सिंह यांनी दिले आहेत.
स्मार्ट सिटी योजनेची रुपरेषा, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची सोय, याची सर्व माहिती यावेळी जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी एन जयराम यांनी 5 गोशाळा चारा पुरविणे,38 गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे अशी माहिती दिली
स्मार्ट सिटी काम त्वरित सुरू करा
शहरातील स्मार्ट सिटी अंतर्गत काम त्वरित सुरू करा अशी सूचना सिंह यांनी अधिकारी मूहिलन आहेत. बैठकीत स्मार्ट सिटीअंतर्गत कोणती काम सुरू आहेत असा प्रश्न विचारला असता प्रोजेक्त अधिकारी मुहीलन यांनी फक्त रामतीर्थ नगर येथे काम सुरू आहे कोणते काम सुरू आहे याची माहिती दिली नव्हती त्यामुळे राकेश सिंह यांनी स्मार्ट सिटी ची काम लवकर सुरू करा अश्या सूचना दिल्या आहेत.1000 कोटी पैकी राज्य आणि केंद्राचे 200 कोटी अनुदान मिळाले आहेत.