दोन-तीन महिने वर्तमानपत्रातून ‘विद्यार्थ्यांच्या
आत्महत्यांच्या बातम्या’ सतत येत आहेत. त्या वाचून
अनेक पालक चिंतित आहेत. या काळात दोन ठिकाणी या
विषयावर तज्ज्ञ म्हणून आमंत्रण आले. तीनशेच्यावर
पालक उपस्थित होते. ही आकडेवारी पालक वर्गाच्या
चिंतेचे द्योतक आहे.
या प्रश्नामध्ये चार कळीचे मुद्दे आहेत –
पहिला मुद्दा त्या मुलांच्या मनाचा, दुसरा शिक्षण
व्यवस्थेचा, तिसरा पालक व मुलांच्या नात्याचा व चौथा
सामाजिक परिस्थितीचा आहे. विद्यार्थ्यांना आत्महत्या
करून स्वत:ला संपवण्यापर्यन्त यावेसे वाटावे हीच
कोणत्याही समाजव्यवस्थेला, शिक्षणव्यवस्थेला
आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे अधोरेखित करणारी
बाब आहे.
मनात आत्महत्येचा विचार येणे हे निश्चितपणे
अपसामान्य (abnormal) किंवा विकृत नाही कारण
असा विचार अनेकांच्या मनात येतो. पण अशी प्रत्यक्ष
कृती करणे हे निश्चित टाळता येईल. वर्तमानपत्रातील
विविध बातम्यांंमध्ये वय, आत्महत्येची कारणे यात बरेच
वैविध्य दिसते. मात्र यातली बहुतांश मुलेे मध्यम व
त्याहून वरच्या वर्गाची होती ! एक ठळक बाब म्हणजे हा
विषय माध्यमांनी उगीचंच बटबटीत केला होता. मार्च
महिन्यापासून आत्महत्येच्या बातम्या कमी झाल्या आहेत
व आता त्या मागच्या पानांवर असतात.
जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या टिपणात
म्हटल्याप्रमाणे, सामान्यपणे सर्व आत्महत्या ह्या
टाळण्याजोग्या असतात. पण त्या टाळण्यासाठी
परिस्थितीत बदल घडायला हवा. हा बदल स्वत:त कोण
करून घेईल, या प्रश्नाचं उत्तर इच्छुक आणि उत्सुक पालक
व स्वतः मुलं असं आहे. ते उत्तर संपूर्ण नाही, पण प्रश्नाची
तीव्रता कमी निश्चित करू शकेल.
आपली पालकत्वाची शैली (Parenting Style)
पालकांनी तपासून पाहावी. व त्यात बदल करण्याची
गरज आहे की काय हे जाणून घ्यावे. आवश्यक असल्यास
योग्य त्या सुधारणाही करता येतील.
– अधिकारशाही पालकत्व : असे पालक कायम ‘हम
करेसो कायदा’ हा बाणा वापरतात.
– बेजबाबदार पालकत्व : हे पालक स्वत: आपली
जबाबदारी पार पाडत नाहीत. त्यामुळे मुलांमुलींना
शिस्त, मूल्यं, जीवनशैली अशा गोष्टींबाबतीत संभ्रम
निर्माण होतात.
– अंकुश न ठेवणारे पालक : असे पालक पालकत्वाच्या
जबाबदारीचा विचार अपुरा झालेले असतात. अपरिपक्व
असतात. मुलांना जे हवे ते देणे एवढीच आपली
जबाबदारी समजतात, त्यामुळे बरे वाईट, सुज्ञ अविचारी
असा भेद न करता येऊन मुलेही भरकटत जातात.
– जबाबदार पालकत्व : हे पालक चर्चा, संवादाचा वापर
करून योग्य नियम तयार करतात, सहभागी असतात व
लोकशाही मार्गाने आपली जबाबदारी पार पाडतात.
अर्थातच पालकनीतीच्या सुज्ञ वाचकांना यातली कोणती
पालकत्व शैली ‘योग्य’ आहे ते कळलेच असेल.
साध्या सोप्या पण अत्यावश्यक गोष्टी
१) ‘मुले आपण वागतो तसे वागतात, सांगू तसे वागत
नाहीत’ ! जेव्हा आपण मुलांना टी.व्ही. बघू नकोस अशी
सूचना अखंडपणे करतो, तेव्हा आधी आपण ती पाळत
आहोत ना हे बघायलाच हवे. !
२) पालकत्व ही २४X७ प्रकारातली जबाबदारी आहे,
जिथे मुलं अनेक प्रश्न घेऊन आपल्यासमोर उभे ठाकतात.
आपल्याकडे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असे
नसले तरी (आपण इतर कुटुंबीय, समुपदेशक, तज्ज्ञ यांची
मदत घेऊ शकतो) आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ
शकतो.
३) आपण प्रशंसा व विधायक टीका / सूचनांचा वापर
करू शकतो.
४) आपलं मुलांशी वागणं थेट, सकारात्मक व कोणताही
आडपडदा न ठेवता असायला पाहिजे. मुलांची सगळीच
लहानशी गुपिते त्यांनी आपल्याशी शेअर केली नाहीत
तरी हरकत नाही पण आपले नाते जर ‘आश्वासक’ असेल
तर ती अनेक महत्त्वाच्या गोष्टी सर्वप्रथम आपल्याला
येऊन सांगतील.
५) आर्थिक परिस्थितीची विशेषत: गरिबीची कल्पना
मुलांना काही प्रकारे द्यायला हवी. थोड्या पैशांचा वापर
करायला, म्हणजे एखादी भाजी, वस्तू ,दुकानातून
आणायला द्यायला वय वर्षे आठ – दहापासून सुरुवात
करायला हवी. घरातले हिशोब, खर्च, आर्थिक अडचणी
यांची माहिती त्यांना ताण येणार नाही अशा पद्धतीने
द्यायला हवी. घरातील कामात त्यांना सहभागी करून
घेतले पाहिजे.
६) तुमच्या बालपण व गतायुष्यातील अडचणी त्यांना
सांगाव्या पण प्रत्येकवेळी तुलना करून उपदेश करू नये,
काळ फार वेगानं बदलत आहे.
७) दुसर्या कुणाही अगदी भावंडातील देखील
मुला/मुलीशी तुलना टाळावी.
८) आपल्या अपेक्षांची ओझी, अपूर्ण इच्छांची ओझी
त्यांच्या शिरावर टाकू नयेत.
पालकांसमोरील पेच
– मुलांची इतरांशी नाती :
मुलांच्या मित्र-मैत्रिणींशी आपण ओळख करून घेऊ
शकतो, शांत आणि स्वस्थपणे त्यांची हालहवालही
जाणून घेऊ शकतो. पण अती ढवळाढवळ मात्र करायला
नको. खास करून किशोरवयीन मुलामुलींना ते अजिबात
आवडत नाही ! इथे पालकांची अनेकदा फार अडचण
होते. काहींना तर आपण आपलेपणाच्या अधिकारानं
आक्रमक होतोय हेच समजत नाही.
– दुसरा पेच असतो मुलांनी ‘पढ लिखकर बडा आदमी’
बनण्याच्या स्वप्नाचा. यशाची, कर्तृत्वाची फूटपट्टी ‘मार्क,
टक्केवारी व ठरावीक व्यवसाय’ ह्याच मानकांनी
मापायचा. आज अनेक कोर्सेस वा नवीन व्यवसायांची
निवड मुलं करू शकतात. मुलाला आवडलेली वाट
घेण्याचा आनंद, ते काम जीव टाकून करण्याचा आनंद
आणि ह्या सगळ्यात आपल्याशी त्यांचे जवळिकीचे नाते
असणे ही खरी श्रीमंती आहे. शिवाय यश ही एकेरी
बाबच नाही, ती अनेकांची अनेकविध पद्धतींची आहे.
आज एका बाजूला देशातली निम्मी मुलंबाळं अर्धपोटी
असली तरी उरलेल्यांना घरात गब्बर पैसा येत
असल्याची जाणीव आहे. आजुबाजूला तो दिसतोही आहे.
अंगावर यावी अशी दिखाऊ बाजारू वृत्ती त्यांच्या
पर्यावरणाचा भाग झालेली आहे. ह्यामुळे फटाफट
प्रसिद्धी देणार्या स्पर्धा, कार्यक्रमांकडे मुले स्वाभाविकपणे
आकर्षित होत आहेत. त्यात हरले तर मग लगेच त्यांना
भयंकर नैराश्य येतं. भाग घेऊ दिला नाही तरीही नैराश्य
येतंच. असे अनेक कार्यक्रम रोज त्या छोट्या पडद्यावर
पाहताना पालकांनाही त्याचा मोह पडतो की आपलं मूल
त्यात कधी जाईल याची आस वाटत राहते? ह्यापैकी
एकही कार्यक्रम मुलांबद्दलच्या कुठल्याही भल्याच्या
भावनेनं केला जात नसून तो आयोजकांच्या खिशाच्या
लांबीरुंदीच्या वाढीसाठी केला जातो. त्यामागचं
अर्थकारण समजून घेतले पाहिजे. ते मुलांपर्यंत पोचवलं
पाहिजे. अर्थात पालक स्वतःच पैसा आणि भपक्याच्या
मोहात अडकले असतील तर मग मार्ग निघणे अवघडच.
मुलांच्या आत्महत्येमागे अनेक कारणे असू शकतात,
– पालकांच्या अपेक्षांना पुरे पडू न शकणं.
– परीक्षेतील अपयश / अपेक्षेपेक्षा कमी मार्क
– कौटुंबिक प्रश्न आणि तुटलेपण
– तेरा ते बावीस वयोगटातील मुला-मुलींचे
प्रेमासंदर्भातले अपेक्षाभंग
– व्यसनाधीनता
आत्महत्येचा विचार करू लागलेल्या काही उदाहरणांचा
विचार करू. ‘वीस वर्षाचा अतुल इंजिनियरींगला सतत
तीन वर्ष नापास झाला होता. त्यामुळे त्याला नैराश्य
आले होते व पालक चिंताग्रस्त होते. आई – वडिल अत्यंत
कष्टातून वर आले होते. झगडले होते. आता मात्र
सुस्थितीत होते. देणगी देऊन मुलाला इंजिनियरींगला
प्रवेश मिळवला होता. पण त्यांना मुलाच्या मनोविश्वात,
भावविश्वात मात्र जराही डोकावता येत नव्हते. मुलाला
त्यांनी पैसे व सर्व सुख – सोयी दिल्या होत्या पण
त्यांच्यातील संवाद तुटला होता. मुलाला फूटबॉल
खेळण्यात, गिटार वाजवण्यात रस होता,ते चांगले येतही
होते. पण गरिबीतून आलेल्या आईवडलांना वाटे, पैसे
मिळवण्यासाठी हे उद्योग काय कामाचे? अतुलला मात्र
इंजिनियरिंग आवडत नव्हते व अवघड जात होते. तो
काहीच ऐकायला व करायला तयार नव्हता. आई
वडिलांचे कष्ट त्याच्या गावीही नव्हते. तो श्रीमंतीत
वाढला होता. आई – वडिलांना त्याची हॉटेलं,
छानछोकीची आवड कळत नव्हती. समुपदेशनानंतर
अतुलची प्रेरणा वाढवता आली. त्याने ध्वनी अभियांत्रिकी
हा वेगळा विषय निवडायचे ठरवले. कुटुंबातील सर्वांचा
एकमेकांशी असलेला संवाद सुधारला.
दुसरी नीला, ही पदव्युत्तर शिक्षण घेत होती. घरची
अत्यंत गरीबी असल्यानं तिची फी काही हितचिंतकांनी
भरली होती. पालक अशिक्षित, घरची परिस्थिती
हालाखीची. ती निराश होती. समुपदेशनाची फी देखील
ती देऊ शकत नव्हती. पण समुपदेशनानं तिला उभारी
देण्याचे, तिचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले.
संघर्ष करायची तिची तयारी होती, तिला सवय होती.
अथक परिश्रम करून ती दोन वर्षे तिने पार पाडली.
अखंड रडणारी मुलगी आत्मनिर्भर झाली. आज ती सासर
व माहेर दोन्ही घरांना हातभार लावते आहे.
काय करता येईल?
अशा अनेक जणांचे समुपदेशन केल्यावर वाटते-
१) शाळा व महाविद्यालयात ‘समुपदेशक’ नेमणे अत्यंत
आवश्यक आहे. ते कुशल आणि प्रशिक्षित असावेत. केवळ
दिखाऊ आणि चुणचुणीत बघून नेमू नयेत ! त्यांना त्या –
त्या वयोगटाबरोबर परिणामकारक काम करता आले
पाहिजे.
समुपदेशक या गोष्टी करू शकतात –
– अभ्यासासंदर्भात नेमके मार्गदर्शन
– मुलं आणि पालक यांच्या नाते संबंधामधील प्रश्न
समजून घेणे व मार्गदर्शन
– समवयीन गटांमधले ताणतणाव व विषमतेसंदर्भात
काम करणे.
– मुलांना व्यापक सामाजिक वास्तव जाणून घेण्याची व
त्यासंदर्भात काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
– लैंगिकता, लैंगिक अत्याचार, एकट्याने पेलाव्या
लागणार्या पालकत्वाचे प्रश्न अशा नाजूक मुद्यांपर्यंत
पोचणे.
यासाठी वैयक्तिक समुपदेशन, पालकांबरोबरचा संवाद,
मुलांच्या सहवासात असणार्या व्यक्तींकडून संदर्भ जाणून
घेणे. मुलांबरोबरचे कृती कार्यक्रम, मानसशास्त्रीय
चाचण्या आणि सामाजिक काम अशा अनेक पद्धती
समुपदेशक वापरू शकतात.
२) जात, धर्म, आर्थिक वैविध्याला स्थान असणार्या शाळा
– महाविद्यालयात विद्यार्थ्यांना एक वेगळेच भान येते.
‘इतर गटातील’ मुलं कशी जगतात हे समजते. इतरांच्या
समस्या बघून माणसं शिकतात.
३) पालक व शिक्षकांकरता कार्यशाळा घेणे अतिशय
आवश्यक आहे. मुलांच्या समस्यांशी दोन हात करायला
कोणीही एक गट अपुरा पडेल.
४) ‘शिक्षण व्यवस्था, कुटुंबातील नाती व समाज रचना’
या सर्व गोष्टी तपासण्याची गरज आहे..
५) ‘आहे रे’ व ‘नाही रे’ गटातील मुलांचे प्रश्न व संघर्ष
यात जमिन अस्मानाचा फरक जाणवतो, हे लक्षात
घ्यायला हवे.
ह्या लेखात केवळ पालकांसमोरील आव्हानांवर भर
दिलेला आहे. ‘नैराश्य व आत्महत्यांच्या संदर्भातून विचार
करताना व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनशैली, शिक्षणाची
उद्दिष्टे, मूल्य व्यवस्था व आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान
यांची सांगड व्यापक समाजजीवनाशी घातली पाहिजे व
तपासली पहिजे. तरच त्यातील विसंगती' जाऊन तो
सांधा आपल्याला जोडता येईल.
विद्यार्थी आत्महत्या : शिक्षणक्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा :-
शिक्षणक्षेत्रातील जीवघेणी स्पर्धा ! सध्याचे युग हे स्पर्धेचे
असल्याने सर्वच क्षेत्रांत स्पर्धा चालू असल्याचे पहायला
मिळते. यातून शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रही सुटले नाही.
आपला पाल्य या स्पर्धेत टिकण्यासाठी पालक शैक्षणिक
भवितव्याला परीक्षांमधील गुणांची आणि टक्केवारीची
मोजपट्टी लावत आहेत. त्यामुळे पालकांची ही वाढती
अपेक्षा पूर्ण करतांना विद्यार्थ्यांची चांगलीच त्रेधातीरपीट
उडत आहे. परीक्षेत पहिला क्रमांक न येता दुसरा क्रमांक
आला; म्हणून महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी इयत्ता
नववीमध्ये शिकणार्या एका विद्यार्थिनीने पालकांचा
रोष सहन होणार नाही, या भीतीने आत्महत्या केली
होती ! परीक्षेतील अपयशामुळे नैराश्य येऊन आत्महत्या
करण्याच्या अशा अनेक घटना घडत आहेत. महत्त्वाच्या
परीक्षांच्या निकालाचा दिवस जवळ आला आणि निकाल
लागला की, नंतरच्या काही दिवसांत आत्महत्यांची वृत्ते
येणारच, असे जणू समीकरण झाले आहे. पुरेशा
महाविद्यालयीन जागांचा अभाव ! इयत्ता दहावी आणि
बारावीच्या परीक्षांमध्ये लक्षावधीच्या संख्येने विद्यार्थी
परीक्षेला बसतात; मात्र त्यांच्या पुढील शिक्षणासाठी जे
काही पदवी अभ्यासक्रम अथवा व्यावसायिक अभ्यासक्रम
उपलब्ध असतात, त्यांमध्ये तितक्या संख्येने जागा
उपलब्ध नसतात. त्यामुळे प्रवेशाच्या सूचीमध्ये क्रमांक
लागावा, यासाठी विद्यार्थ्यांची पराकोटीची धडपड चालू
असते. महाविद्यालयांमधील जागांच्या प्रमाणात त्यात
प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांची संख्या खूप अधिक
असल्याने मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. त्यामुळे
विद्यार्थी थोडसे अपयशही पचवण्याच्या मानसिकतेत
राहिले नाहीत. या स्पर्धेच्या युगाला नियंत्रणात आणणे
आता कठीण होऊन बसले आहे. व्यसनाधिन बनवणारी
शिक्षणपद्धती ! परीक्षेतील या स्पर्धेमुळे निर्माण होणारा
ताण अल्प करण्यासाठी बरेच विद्यार्थी व्यसनांच्या
आहारी जाऊ लागले असल्याचे चित्र समोर येत आहे.
विशेष करून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय
अभ्यासक्रमातील विद्यार्थी ताणामुळे व्यसनांच्या आहारी
गेल्याचे प्रमाण लक्षणीय आहे. या संधीचा लाभ उठवत
काही समाजद्रोह्यांनी मुंबईत शाळा-महाविद्यालयांच्या
परिसरात ‘हुक्का पार्लर’ उघडले आहेत. दक्षिण मुंबईत
यांचे प्रमाण अधिक आहे. स्पर्धेच्या ताणामुळे व्यसन
किंवा ताण अती झाल्यास नंतर आत्महत्या हा पुढचा
पर्याय आता विद्यार्थी निवडू लागले आहेत. अपयशामुळे
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र ! कु. ऋतिका चॅटर्जी ही
१९ वर्षीय विद्यार्थिनी कानपूर येथील भारतीय
तंत्रशिक्षण (आय.आय.टी.) संस्थेमध्ये अभियांत्रिकी पदवी
अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत दोन
विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाली. त्यामुळे तिने ३० मे २००७
या दिवशी वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून
आत्महत्या केली. आरक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कु.
ऋतिका हिला परीक्षेचा प्रचंड ताण आला होता. कानपूर
येथील तंत्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा अथवा
निकाल यांचे दडपण घेऊन आत्महत्या करणारी ऋतिका
ही पहिली नव्हती. मागील तीन वर्षांतील ही सातवी
आत्महत्या होती ! ‘विकीपिडीया’ या संकेतस्थळाने
प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार खिस्ताब्द २००४ मध्ये
भारतात एकूण ४ सहस्र ५९९ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा
ताण घेऊन आत्महत्या केली, तर ‘दी टाइम्स ऑफ इंडिया’
या इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार खिस्ताब्द
२००६ मध्ये देशभरात एकूण ५ सहस्र ८५७
विद्यार्थ्यांनी परीक्षेचा ताण घेऊन आत्महत्या केली.
विद्यार्थ्यांची ही आकडेवारी पहाता सध्याची
शिक्षणपद्धती मुले घडवत आहे कि ती संपवत आहे, हेच
कळत नाही. प्रतिवर्षी ४ ते ५ सहस्र विद्यार्थी परीक्षा,
अभ्यास यांचा ताण घेऊन आत्महत्या करतात. यावर
शासनाने उपाय म्हणून परीक्षा न घेणे किंवा तीन
विषयांत अनुत्तीर्ण झाले, तरी पुढच्या वर्गात घालणे, असे
हास्यास्पद उपाय शोधले आहेत. समस्यांच्या मुळाशी न
जाता असे वरवरचे उपाय हे देशासाठी घातकच आहेत.
शासनाच्या या उपायांतून विद्यार्थी कर्तृत्ववान
बनण्यापेक्षा ते पुढे केवळ कारकून बनावेत, असेच काहीसे
धोरण दिसत आहे. विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास
व्हावा आणि त्याचा देशसेवेत हातभार लागावा, असा
उद्देश दूर राहिला आहे. जगाचा आध्यात्मिक गुरु
असलेल्या भारतात निधर्मी राज्यकर्त्यांनी पाश्चात्त्य
मेकॉलेची शिक्षणप्रणाली अवलंबल्यावर आणखी वेगळे
काय पहायला मिळणार ? ही स्थिती पालटण्यासाठी असे
कारकून बनवणारी शिक्षणप्रणाली हटवून राष्ट्र आणि धर्म
हित साधणारे नागरिक निर्माण करणारी गुरुकुल
शिक्षणपद्धती अवलंबणे आवश्यक आहे !
-गेल्या पाच वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यतेचे प्रमाण
वाढले आहे. त्यात विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय
असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभ्यासाचा ताण, नापास होण्याची भीती या कारणांमुळे
विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. याबाबत पोलिस
प्र्रशासनाने अहवाल तयार केला आहे. २००५ ते मे
२०११ पर्यंत राज्यात २ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी
आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे.
शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीपासूनच अपेक्षांचे ओझे
असल्याने विद्यार्थी तणावात असतात. चाचणी परीक्षेत
अपेक्षित गुण मिळाले नसल्याने अनुत्तीर्ण होण्याची भीती
वाढून विद्यार्थी आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेतात.
२००९ या वर्षी ४०४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर
२०१० मध्ये हीच संख्या ४७१ झाली. यंदा मे
महिन्यापर्यंत १८३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यात
६० टक्के मुलींनी नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या
केली. परीक्षेत अव्वल क्रमांकावर विद्यार्थिनी, तर
आत्महत्यांमध्येही विद्यार्थिनींची अधिक आहे.
आत्महत्येची कारणे
नापास होण्याची भीती, पेपर अवघड गेल्याचे शल्य,
अपेक्षित गुण नसल्याने आलेला ताण ही आत्महत्येमागील
मुख्य कारणे आहेत. पालक व शिक्षकांचे रागवणे,
प्रेमभंग, रॅगिंग ही आत्महत्येची इतर कारणे आहेत.
चित्रपटातील स्टंट पाहूनही आत्महत्या केल्याची
उदाहरणे आहेत. स्पर्धेमुळे शहरात विद्यार्थ्यांच्या
आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.
मुलींमध्ये नैराश्य अधिक प्रमाणात
मुली भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात. मुलांच्या
तुलनेत नैराश्याचे प्रमाण जास्त म्हणजे ३:१ आहे.
त्यामुळे अतिनैराश्यातून मुली आत्महत्या करण्याकडे
वळतात.
Students… Remember, " Exams are just one
Dr sonali sarnobat
Sarnobat’s Homeopathic research centre and
Multyspeciality Homeopathy
09916106896
099649 46918
small milestone in life, not life itself "…!!