जम्मू काश्मीर येथे दशहतवादी हल्ल्यात हुतात्म्य पत्करलेल्या सी आर पी एफ चा जवान बसप्पा हनमंताप्पा बजंत्री (42) याच्या पार्थिवा त्याच्या मूळ गावी बैलूर येथे बुधवारी अंतिम संस्कार करण्यात आला . कित्तूर तालुक्यातील बैलूर गावात जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासकीय इतमामात अंतीम संस्कार करण्यात आले.
गेल्या16वर्षां पासून केंद्रीय राखीव पोलीस दलात सेवा बजावत असलेले बसप्पा बजंत्री यांनी आपण आठवडा भरात सुट्टीवर मूळ गावी येऊ असं कळविले होते मात्र परतण्याच्या आत त्यांच पार्थिव गोवा मार्गे त्यांच्या मूळ गावी परतलं.
बैलूर गावातील मैदानात अंतिम संस्काराची व्यवस्था करण्यात आली होती पार्थिवाच गावात आगमन होताच कुटुंबीयांनी आक्रोश केला. सी आर पी एफ एस पी संजय ताथा, जिल्हाधिकारी एन जयराम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रविकांत गौडा यांनी हजेरी लावली होती. सी आर पी एफ च्या जवानांनी हवेत गोळीबार करून सलामी दिली यावेळी हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते