बेळगाव येथील शहापूर येथील बेटिंग प्रकरणाशी संबंधित हुबळी येथील दोघा बुकींना सी सी बी पोलिसांनी अटक केलं आहे
कृष्णा रघुनाथ कबाडी रा.केशवपूर हुबळी आणि नेकार नगर येथील देवेंद्र वासुदेव जेडी अशी या दोघा युवकांची नाव आहेत.
हुबळीत बसून बेळगाव मध्ये क्रिकेट वर बेटिंग चालवत होते पोलिसांनी धाड टाकून 45 हजार हुन अधिक रोख रक्कम आणि 11 हजारांचे मोबाईल सेट,टी व्ही संच, बेटिंग व्यवसायाला लागणारे समान जप्त केले आहे. शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक गड्डेकर, शहापूर निरीक्षक लककनांवर यांचया नेतृत्वात ही कारवाई केली आहे.
Trending Now