रिजर्व बँकेनं दिलेल्या मार्गसुचीच उल्लंघन केल्या प्रकरणी गोवा वेस सिंडिकेट बँकेचे मॅनेजर डी राजशेखर यांच्यावर सी बी आय ने धाड टाकली असून क्रिमिनल केस दाखल केली आहे. डेक्कन हेराल्ड या इंग्लिश दैनिकाने ही बातमी छापली आहे.
आर बी आय च्या सर्क्युलर नुसार बँकेत काम न केल्याचा,आणि कामात नियमित पणा न ठेवल्याचा ठपका राजशेखर यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांनी 12 लाख रुपयांची नॉन होम ब्रांच मधून संशयास्पद ट्रांजंक्शन तसेच नवीन करन्सी ची बेकायदेशीर ट्रांजंक्शन केल्याचा संशय आहे.या शिवाय दररोज चा चुकीचा रिपोर्ट मुख्यालयास देणे ट्रांजंक्शन केलेल्या कुटुंबियांची चुकीची माहिती देणे असे देखील आरोप आहे.
राजशेखर यांच्या बेळगाव आणि तेलंगणा येथील करीम नगर येथील घर कार्या लयावर छापा मारून कागदपत्र देखील सी बी आय ने जप्त केली आहेत