Wednesday, May 8, 2024

/

भक्ती महिला संस्थेची वार्षिक सभा

 belgaum

Bhakti mahila societyश्री भक्ती महिला को ऑप क्रे सोसायटी म्हणजे महिलांनी महिलांच्यासाठी चालवलेली एकमेव सोसायटी अशीच ओळख समाजात आहे . महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी श्री भक्तीचे संचालक मंडळ कटिबद्ध असल्याची ग्वाही सोसायटीच्या एकोणिसाव्या सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरपर्सन ज्योती अगरवाल यांनी दिली .

श्री माता सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत मागील वर्षाच्या सभेचा वृत्तांत वाचण्यात आला . ताळेबंद ,अंदाजपत्रक ,लाभांश वितरण ,पोटनियम दुरुस्ती आदी ठराव एकमताने सभेत मंजूर करण्यात आले . व्यवस्थापक अतुल कुलकर्णी यांनी ताळेबंद सादर केला .

एकूण खेळते  भांडवल पस्तीस कोटी असून वार्षिक उलाढाल एकशे पाच कोटीची आहे . सोसायटीला निव्वळ नफा एक कोटी सात लाख रु इतका झाला असल्याची माहिती ज्योती अगरवाल यांनी सर्वसाधारण सभेत दिली . भक्ती देसाई यांनी सूत्रसंचालन करून ठराव मांडले . सोसायटीचे संस्थापक मनोहर देसाई यांच्यासह भागधारक ,संचालक ,निमंत्रित ,कर्मचारी यांची सर्वसाधारण सभेला उपस्थिती होती .

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.