न्यु गांधी नगर मधील बंटर भवन जवळ गांजा विकणाऱ्या युवकांना अटक करून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. पोलिसांना गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकुन 40 किलो गांजा जप्त करत तीन युवकांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गांधी नगर चे शफिन दावल मलिक, बेलद बागेवाडी चे शीतल संजीवगोळ,झटपट कॉलनी शब्बीर जिलानी अत्तार यांना अटक करून त्यांच्या जवळील 40 किलो गांजा एक ऑटो रिक्षा आणी दुचाकी वाहन जप्त केले आहे.
सगळे आरोपी जमखंडी हुन गांजा आणून बेळगाव मध्ये विकत होते त्यावेळी सी सी पोलिस निरीक्षक गडडेकर आणि सहकार्यानी ही कारवाई केली आहे.मोठया प्रमाणात गांजा पकडल्याने पोलीसाना बक्षीस देण्याची घोषणा आयुक्त कृष्णा भट्ट यांनी केली आहे
Trending Now