या मातीत जन्मलेल्या गरिबांना मिळायचं असलेला आश्रय योजनेचा लाभ बांग्लादेशीना मिळत आहे असा आरोप भाजप खासदारांनी केल्या नंतर बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात या विषयावर गरम चर्चा ऐकावयास मिळाली.
खासदार आनंतकुमार हेगडे आणि खासदार सुरेश अंगडी यांनी या विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. बेळगावातील गरीब जनतेला मिळणारी घर कोणत्या कायद्या आधारे बांग्लादेशी ना दिली जातात असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं
शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात समन्वय उत्सुवारी समिती च्या विकास आढावा बैठकीत बोलताना खासदारांनी ही भूमिका मांडली आहे.
लोकांना वाटायची घर बेकायदेशीर रित्या बेळगावात राहणाऱ्या बांग्लादेशी लोकांना कोणत्या पुराव्या द्वारे अधिकारी वाटप करतात असा देखील प्रश्न उपस्थित केला.
केंद्रीय गुप्तचर खात्याने दिलेल्या अहवालानुसार जवळपास एक हजार रहिवाशी दाखले बांग्लादेशीना दिली गेलेत याचा तपास करण्याची मागणी खासदार हेगडे यांनी केली आहे.
सभेत जिल्हा पंचायत सी इ ओ रामचंद्रन, पालिका आयुक्त एम शाशीधर , आमदार संभाजी पाटील उपस्थित होते