एन जयराम जिल्हाधिकारी बेळगाव यांच्या कडून ऑटो मीटर सक्ती बैठकीत अधिकाऱ्यांची कान उघडणी करण्यात आली आहे एक महिन्याच्या आत ऑटो मीटर सक्ती करा अन्यथा अधिकाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच आयोजन करण्यात आलं होत त्यावेळी जयराम यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली पोलीस आणि परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यास आदेश देत शहरातील बेकायदेशीर ऑटो वर कारवाई करा असंही बजावलं आहे.
डी सी पी अमरनाथ रेड्डी म्हणाले की कोणीही प्रवासी ऑटो मीटर नसल्याची तक्रार करायला पुढं येत नसल्याने कारवाई साठी विलंब होत आहे जर का प्रवाश्यानी तक्रार केली तर कारवाई केली जाईल अस ते म्हणाले.शहरातील 6 हजार ऑटो पैकी अगदीच कमी ऑटो परवाना रिनिवल केलाय उरलेल्या ऑटो अपघात केल्यास प्रवाश्यांची काय परिस्थिती होईल असा प्रश्न पोलिस अधीक्षक रविकांत गौडा यांनी व्यक्त केला
पुढील एका महिन्यात 100 टक्के मिटर सक्ती न झाल्यास जयराम यांनी सर्व अधिकाऱ्यांसह कायम स्वरूपी कारवाई करणार असा इशारा दिला आहे