Friday, April 26, 2024

/

माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना अटक

 belgaum

Sunthkar shivaji

 

एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना रविवारी रात्री माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.मध्यरात्री त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.

 belgaum

सुंठकर यांनी शनिवारी आपल्याला मारहाण केल्याची फिर्याद संबंधीत अधिकाऱ्याने दिली आहे. आपण मालवण येथील दुर्घटना ग्रस्थांना मदतीसाठी गेलो होतो, त्यामुळे या मारहाणीशी आपला संबंध नसल्याचे सुंठकर यांनी म्हटले आहे.

या कारवाईमागे काही राजकीय डाव असल्याचे बोलले जात आहे. अनधिकृत कत्तलखान्यांसंदर्भातील तक्रारी केल्याबद्दल आपल्याला अकारण अडकविण्यात आल्याची प्रतिक्रिया शिवाजी सुंठकर यांनी दिली. ए पी एम सी मध्ये खेचून आणलेली सत्ताही जिव्हारी लागल्याने काही मंडळींनी कुभांड रचल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.