बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील झुंजरवाड गावातील शेतात काढण्यात आलेल्या कुपनलिकेच्या खड्ड्यात पडलेल्या ६ वर्षाच्या मुलीच्या संरक्षणासाठी शनिवारी सायंकाळपासून सलग ५० तास शोधमोहीम सुरू होते, मात्र कावेरी नामक त्या मुलीला जिवंतपणे बाहेर काढणे शक्य झाले नाही.
सोमवारी सायंकाळी ६:३० वाजता तिच्या मृतदेहाचा काही भाग सापडला आहे. उरलेला २५ टक्के भाग बाहेर काढण्याचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत अशी बातमी मिळाली आहे.
या स्थळी उपस्थित डॉक्टरांचे पथक उपस्थित आहेत. त्यांनी कावेरीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतरच तो जोडून नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.
मुलीला जिवंतपणे बाहेर काढण्याचे मोठे प्रयत्न झाले.मात्र समस्या येत होत्या. यामुळे बाजूला आणि एक खड्डा काढून सुरंग मार्गाने तिला काढण्याचा प्रयत्न झाला, तरीही अपयश आल्याने तपास पथकानेही दुःख व्यक्त केले आहे.
तब्बल २२ फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या मुलीवर वरून माती पडल्याने घुसमटून तिचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी५:३० वाजता मुलगी त्या खड्ड्यात पडली होती. तिच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी दिलेल्या माहितीमुळे हे उघड झाले होते. तिची आई सविता हिने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता तेंव्हा काहीकाळ ती बोलली होती. नंतर मात्र तिचा आवाज बंद झाला, त्यावेळी आईने दोरी सोडून तिला वर घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश आले नाही.
तपास पथकाने कॅमेरा सोडून पाहणी करता तिचे डोके आणि कपडे दिसले होते.त्यानंतर तपास काम सुरू झाले.मात्र हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
No anybody political party, social worker any to support 300 worker’s of Aequs company. This our bad luck. We are last 4 months out of company without salery.