कौटुंबिक वादाला कंटाळून एका सैनिकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बैलहोंगल तालुक्यातील गणीकोप्प येथे घडली आहे . पण त्याच्या मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अद्याप त्याचे नातेवाईक पुढे आले नाहीत . त्यामुळे बसवराजचा मृतदेह जिल्हा शवागारातच आहे .
बसवराज हुलिकवी (३०) असे मृत सैनिकाचे नाव आहे . सोमवारी रात्री त्याने कौटुंबिक वादाला कंटाळून विष प्रश्न केले .नंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचाराचा काही उपयोग न होता त्याचे मंगळवारी निधन झाले .
आत्महत्या केलेल्या बसवराज याच्या वडिलांनी आंतरजातीय विवाह केला होता . वडील हिंदू तर आई मुस्लिम होती . मृत बसवराजची पत्नी मुस्लिम आहे . पण मृत सैनिकाचे नाव बसवराज असल्यामुळे त्याच्यावर कोणत्या पद्धतीने अंत्यसंस्कार करायचे याबाबत नातेवाईकांत गोंधळ निर्माण झाला आहे . बसवराजचे वडील काही वर्षांपूर्वी मृत झाले आहेत . आई आणि पत्नी मुस्लिम यामुळे हिंदू असलेल्या बसवराजचे कौटुंबिक वाद उदभवत होते . यालाच कंटाळून बसवराजने विष प्राशन करून आपले जीवन संपवले . सायंकाळ पर्यंत बसवराजचा मृतदेह कोणीच आली नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे