बेळगाव दि ८-पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री सक्षमपणे उभी आहे. ती जितकी कठोर तितकीच संवेदनशीलसुद्धा आहे. आपल्यावरच्या कौटुंबिक जबाबदा-या ती लिलया पेलते. बेळगावातील अशीच एक सावित्रीची लेक आहे की जी शाळा शिकत शिकत आपल्या वडीलांसोबत गॅरेज सांभाळते….
ही आहे बेळगाव शहरातील महाद्वार रोड मध्ये राहणारी १९ वर्षीय युवती स्मिता जाधव ! महाद्वार रोडवरील सरकारी १२ नंबर शाळेत शिक्षण घेत घेत स्मिता आपल्या वडिलांना पंक्चर काढण्याच्या कामात मदत करतेय. गॅरेज मध्ये काम करताना ती आईला घरकामातही मदत करते. स्मिताने आत्तापर्यंत अनेक गाड्यांचे पंक्चर्स काढले आहेत. दहावीपर्यंत सकाळी २ तास सायंकाळी २ तास पंक्चर काढण्याचे काम करत होती. मात्र भातकांडे महाविद्यालयात १२ वि असल्यांमुळे सकाळी ११ पर्यंत कॉलेजला जाते आणि मग दिवस भर पंक्चर दुकानात काम करते . ह्या कामाचा तिला अजिबात कंटाळा येत नाही.
घरची स्थिति हलाखीची असताना देखील स्वावलंबीपणा दाखवत आपल्या वडिलांना व्यवसाय आणि कुटुंबासाठी मदत करणाऱ्या आदर्श युवतीला “बेळगाव live” चा सलाम !! आज महिला पुरुषांबरोबर सर्व क्षेत्रात बरोबरिने ज़ात आहेत. स्मिता सारख्या मूलींचा आदर्श इतर मुलींनी घेणे गरजेचे आहे.