बेळगाव दि 8- मुत्यानहट्टी येथे नराधमांनि केलेला पाशवी बलात्कार हा समस्त स्त्री जातीचा अपमान आहे, त्या नराधमांना कठोरतील कठोर शासन करा. या मागणीसाठी बेळगावच्या स्त्री शक्तीने बुधवारी शहरातून मूक मोर्चा काढला. तोंडावर पट्टी बांधून आणि हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या या महिलांनी जिल्हाधिकारी एन जयराम यांच्याकडे निवेदन सादर केले.
बलात्कार हि हीन प्रवृत्ती आहे, तिचा बिमोड व्हायलाच हवा असे म्हणणे या महिलांनी मांडले.महिलांची सुरक्षा, घरगुती आणि सामाजिक पातळीवर होणारे हिंसाचार, स्त्रियांचे लैंगिक शोषण आदींवर कडक कायदा होण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.