बेळगाव दि 22- कर्नाटक राज्य सरकार ने यावर्षीच्या बजेट मध्ये विश्व कन्नड संमेलना साठी 20 कोटी अनुदान मंजूर केलं आहे. यंदाचं संमेलन दावनगेरे येथे होणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
राज्य सरकार ने बजेट मध्ये 10 कोटी अनुदानाला मंजूरी दिली असून दावनगेरी स्थळ निश्चित केल आहे मात्र याच्या तारखेची घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या करणार आहेत .
कन्नड आणि संस्कृती खात्याच्या अधिकार्यानी दावनगेरी भेट देऊन मैदानाची पाहणी केली आहे .
2009 मध्ये बेळगाव मध्ये माजी मुख्यमंत्री बी एस येदूरप्पा सरकार ने आयोजन केले होत त्या नंतर 8 वर्षांनी सिद्धरामय्या सरकार दावनगेरी आयोजित केल आहे.2017 जून महिन्यात या संमेलनाची तारीख नक्की केली जाऊ शकते