बेळगाव दि २:शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच बेळगाव विमान तळावर जल्लोषी स्वागत करण्यात आल . गुरुवारी रात्री कोल्हापूर हून मुंबई ला विशेष विमानाने जाण्यासाठी ते बेळगाव विमान तळावर आले होते यावेळी सांबरा भागातील युवा कार्यकर्त्यांनी ठाकरे याचं बेळगाव विमान तळावर जल्लोषी स्वागत केल .कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीर सागर यांच्या चिरंजीवाचा विवाह सोहळा आटोपून ते बेळगाव हून खास विमानाने मुंबई ला जाण्यासाठी बेळगाव विमान तळावर आले होते.कोल्हापूर विमान तळावर विमानाची नाईट उड्डाण( लंडीग) सोय नसल्याने नेहमीच रात्रीची उद्द्दन सोय असल्याने अनेक व्ही आय पी बेळगाव विमान तळाचा आधार घेत असतात
बेळगाव महापौर उपमहापौर पदी मराठी भाषिकांची निवड झाल्या बद्दल उद्धव ठाकरे यांनी सीमा भागातील मराठी जनतेच यावेळी अभिनंदन केल आणि मुंबई चा महापौर शिव सेनेचाच असेल अस वक्तव्य देखील केल. ठाकरे सोबत यावेळी उच्च तंत्रज्ञान मंत्री रविद्र वायकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार चंद्रद दीप नरके ,शिव सेना जिल्हा प्रमुख संजय पोवार आदी ठाकरे यांच्या सोबत होते. यावेळी नारायण कणबरकर यांच्या नेतृत्वात मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली उपस्थित कार्यकर्त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या .
ठाकरे चंद्रकांत दादा आमने सामने
मुंबई महापालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील बेळगाव विमानतळावर समोरासमोर आले. मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांशी बोलणं टाळलं आणि केवळ स्मितहास्य करत नमस्कारावर निभावून नेलं.चंद्रकांत दादा पाटील याचं हेलोकोप्टर बेळगाव विमान तळावर आहे ते विमान तळावरून कोल्हापूर कडे रवाना होते वेळी ठाकरे आणि दादा आमने सामने आले होते .