मुंबई दि 16- सीमाभागातील मराठी पत्रकारांना शासन मान्यता कार्ड आणि पेन्शन सह महाराष्ट्र शासनाच्या सुविधा मिळणार आहेत या बद्दल राज्य सरकार चा निर्णय झाला असून या लवकरच जी ओ निघणार आहे असं ठाम आश्वासन महाराष्ट्र सरकार चे मुख्य सचिव सुमित मलिक यांनी दिल आहे .
मुंबई मुक्कामी बेळगाव live च्या वतीनं मलिक यांची भेट घेण्यात आली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं आहे. ज्या प्रकारे दिल्लीतील मराठी पत्रकारांना राज्य शासनाच्या सुविधा देण्यात येतात त्याच धर्तीवर बेळगावातील मराठी पत्रकारांना शासन मान्यता प्राप्त सुविधा मिळणार आहेत याकामी लवकरच जी ओ निघेल असं ते म्हणाले . माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या निवृत्ती नंतर सुमित मलिक यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे .
यावेळी बेळगावात प्रश्नाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील कामकाजा बाबत महाराष्ट्र शासना कडून संभाव्य मदत करून सामान्य प्रशासन विभागास बेळगाव प्रश्नी सहकार्य करा असा आदेश देऊ असं देखील मलिक यांनी पत्रकाराच्या शिष्ट मंडळास आश्वासन दिलं आहे . यावेळी विधी मंडळाचे पत्रकार गोविंद तुपे, महाराष्ट्र वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे, इंदू मिलच्या मागणीचे प्रणेते चंद्रकांत भंडारे बेळगाव चे पत्रकार प्रकाश बेळगोजी उपस्थित होते.