Friday, April 26, 2024

/

एक दौड बाल विनयभंग महिला सबलीकरण साठी

 belgaum

बेळगाव दि ९ : खास महिला दिनाचं औचित्य साधून अनुजा मुद्दा ही युवती गोवा ते पुणे हे अंतर धावत पूर्ण करणार आहे . गोव्या पासून ८ मार्च सुरु झालेली तिची दौड १३ मार्च रात्री ८ वाजता बेळगावला पोचणार आहे . बेळगाव येथील संकल्प भूमीला भेट देणार असून या ठिकाणी महिला सबलीकरण बद्दल विध्यार्थी आणि महिला संघटनांशी संवाद साधणार आहे .

महिला सबलीकरण बाल विनयभंग जनजागृती साठी एक दोन नाही तर तब्बल ६० कि मी धावते आहे तीच नाव आहे अनुजा मुद्दा … अनुजा हिने जनजागृतीचा प्रवास एक वर्ष आधी सुरु केला होता तिने आता पर्यंत २ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत अनेक मॅरेथॉन स्पर्धा तिने जिंकल्या आहेत एक मानवता वादी स्त्री म्हणून तिला नेंहमी महिला आणि बालका बद्दल नेहमी चीड वाटत आली आहे .
अनुजा ने सांगितले की ” गेल्या काही वर्षात मुलांच्या विनयभंग करण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे . यातील अनेक केस मध्ये मुलांना स्वतःच्या कुटुंबातील सदस्या कडून त्रास दिला जातो ही बाब अत्यंत धक्कादायक आहे अशी अनेक उदाहरण बातम्या आपण ऐकल्या आहेत मात्र त्याच्याच परिवारातील सदस्यांच्या दबावामुळं केस मागे घेतल्या आहेत . लाज आणि पश्चातापाने भरलेली अशी मुलांना भविष्यात मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि पुढील आयुष्यात वैवाहिक जीवनात शारीरिक त्रास सहन करावा लागतो” .
बाल विनयभंग आणि महिला सबलीकरण याला प्रोत्साहन देण्यासाठी तिने खास योजना तयार केली असून याच्या जनजागृती साठी ८ मार्च रोजी गोवा ते पुणे दररोज ६० किलो मीटर धावणार आहे . ४५० किलो मीटर चा टप्पा ती दररोज ६० कि मी धावून पूर्ण करणार असून तीन राज्यात जाताना हे अंतर ८ दिवसात पूर्ण करणार आहे .anuja-mudda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.